टिळक आणि आगरकर हे प्रसिद्ध लेखक कै. विश्राम बेडेकर लिखित एक मराठी नाटक आहे. "मराठी रंगभूमीवरील एक सुवर्णपान" म्हणून या नाटकाकडे पाहिले जाते.

टिळक आणि आगरकर (नाटक)
लेखन कै. विश्राम बेडेकर
भाषा मराठी
देश भारत
दिग्दर्शन सुनिल रमेश जोशी
संगीत ज्ञानेश पेंढारकर, नंदलाल रेळे
कलाकार नयना आपटे,
आकाश भडसावळे,
सुनिल जोशी,
संध्या म्हात्रे,
गायत्री दीक्षित,
अनुष्का मोडक,
जगदीश जोग

ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मश्री वामन केंद्रे यांच्या कार्यशाळेत पूर्वी अनेकदा या नाटकातले स्वच्छ संवाद अभ्यासाला म्हणून दिले जात. १९८२ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेकडून हे नाटक सर्वप्रथम रंगमंचावर आले. त्याचे लेखन आणि दिग्दर्शन विश्राम बेडेकर यांचेच होते. त्यावेळी भक्ती बर्वे, प्रमोद पवार, जयंत सावरकर, अतुल परचुरे, श्याम पोंक्षे, निवेदिता सराफ अशी दिग्गज पण त्यावेळी उदयोन्मुख कलाकारांची फळी त्यात काम करत असे. आकाशवाणी मुंबई केंद्राने या नाटकाचे अभिवाचन ध्वनिमुद्रितही केले आहे. ते यूट्यूब वर उपलब्ध आहे.

२०१७ साली जवळजवळ ३५ वर्षानंतर पुन्हा एकदा अभिजात आणि श्री आर्यादुर्गा क्रिएशन्स या संस्थांनी हे नाटक पुनरुज्जीवित केले. ज्यात पद्मश्री नयना आपटे, आकाश भडसावळे, सुनिल रमेश जोशी, संध्या म्हात्रे, गायत्री दीक्षित, अनुष्का मोडक, जगदीश जोग, अथर्व गोखले यांच्या भूमिका महत्वाच्या होत्या. मूळ नाटक त्यावेळच्या पद्धतीनुसार तीन अंकी असले तरीही नव्याने त्याचे सादरीकरण करताना नवे दिग्दर्शक सुनिल रमेश जोशी यांनी ते दोन अंकात चपखल बसवले. नव्या संचातील नाटक हे नव्या पद्धतीने पण जुनेपणा जपून सादर केले गेले आणि रसिकांना ते भावले देखील. हे अविस्मरणीय असे नाटक दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने कायमस्वरूपी जतन केले असून या नाटकाचा दृश्य (व्हिडीओ) स्वरूपातील संपूर्ण प्रयोग सह्याद्रीच्या यूट्यूब वर उपलब्ध आहे.