सह्याद्री (वाहिनी)

(दूरदर्शन सह्याद्री या पानावरून पुनर्निर्देशित)



सह्याद्री ही दूरदर्शनची मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात प्रसारित होणाही उपग्रह व प्रादेशिक वाहिनी आहे. ही महाराष्ट्रातील दूरदर्शनची सर्वात जुनी वाहिनी आहे. याचे २४ तास प्रक्षेपण सुरू असते. मराठी बातम्या व मालिकांसाठी या वाहिनीस बराच मोठा प्रेक्षकवर्ग आहे. दूरदर्शन हे स्वतःचे कार्यक्रम स्वतःच निर्माण करते. काही कार्यक्रम, विशेषतः मालिका, ह्या खाजगी निर्मात्यांकडून पण तयार केल्या जातात.

सह्याद्री वाहिनी
सह्याद्री (वाहिनी) दूरदर्शन
सुरुवातइ.स. १९९४
मालक प्रसार भारती
ब्रीदवाक्य सत्यम शिवम सुंदरम्
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत, चीन, आखाती देश, इतर जगातील बहुसंख्य देश
मुख्यालयमुंबई
जुने नावदुरदर्शन केंद्र मुंबई
भगिनी वाहिनीदूरदर्शनच्या इतर प्रादेशिक वाहिन्या आणि दिल्ली दूरदर्शन केंद्र
प्रसारण वेळ२४ तास प्रक्षेपण
संकेतस्थळwww.ddkSahyadri.tv

त्याचे मुख्यालय हे वरळी, मुंबई येथे आहे. सह्याद्रीस त्याचे स्वतःचे निर्माण-कक्ष आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली बाह्य-प्रक्षेपण वाहने (Outdoor Broadcasting Vans), सर्व निर्मितींसाठी अद्ययावत संपादनाच्या सुविधा इत्यादीने ते परिपूर्ण आहे.

दूरदर्शन बातम्या टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP
TVT क्रमांक
आठवडा ४७ २०१५ १.३
आठवडा १२ २०२० २.०
आठवडा १४ २०२० २.१
आठवडा १५ २०२० १.९
आठवडा १६ २०२० १.७
आठवडा १७ २०२० १.७
आठवडा १८ २०२० १.३
आठवडा १९ २०२० १.१
आठवडा २० २०२० १.२
आठवडा २१ २०२० ०.७
आठवडा २५ २०२० १.१
आठवडा २६ २०२० १.४
आठवडा २७ २०२० १.४