बाबा सिद्दीकी
बाबा झियाउद्दीन सिद्दीकी (१३ सप्टेंबर, १९५८ - १२ ऑक्टोबर, २०२४) हे एक भारतीय राजकारणी होते जे वांद्रे पश्चिम मतदारसंघासाठी महाराष्ट्र राज्यातील विधानसभेचे सदस्य (आमदार) होते. १९९९ , २००४ आणि २००९ मध्ये ते सलग तीन वेळा आमदार होते आणि २००४ ते २००८ दरम्यान मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अंतर्गत अन्न व नागरी पुरवठा (FDA) आणि कामगार राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले होते.[१]
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर १३, इ.स. १९५८ पाटणा जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑक्टोबर १२, इ.स. २०२४ मुंबई | ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद |
| ||
पद | |||
अपत्य | |||
| |||
सिद्दीकी यापूर्वी १९९२ ते १९९७ या कालावधीत सलग दोन वेळा नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.[२] नंतर १२ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.[३]
मृत्यू
संपादनसिद्दीकीची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलगा झीशान सिद्दिकीच्या कार्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.[४][५]
बाबा सिद्दिकीवर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईत तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत्यू समयी ते ६६ वर्षांचे होते. सूत्रांनी सांगितले की, सिद्दिकीवर रात्री साडेनऊच्या सुमारास वांद्रे पूर्वेचे आमदार असलेले त्यांचा मुलगा झीशान यांच्या कार्यालयाजवळ तीन गोळ्या झाडण्यात आल्या.[६][७][८][९] या प्रकरणी तत्काळ दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले, हरियाणा येथील गुरमेल बलजीत सिंग आणि उत्तर प्रदेशातील धर्मराज राजेश कश्यप अशी त्यांची नावे आहेत. सध्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या नेतृत्वाखालील टोळीचा या हत्येत सहभाग असल्याची पुष्टी मुंबई पोलिसांनी केली आहे.[१०][११] हरियाणा येथील गुरमेल बलजीत सिंग आणि उत्तर प्रदेशातील धर्मराज राजेश कश्यप अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी आणखी दोन संशयितांची नावे दिली आहेत, शिवकुमार गौतम उत्तर प्रदेश, आणि मोहम्मद जीशान अख्तर. पोलिसांनी प्रवीण लोणकर याला अटक केली आहे. त्याने गोळीबार करणाऱ्यांना रसद पुरवली असून त्याचा फरार भाऊ शुभम लोणकर हा गोळीबारामागील सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.[१२][१३][१४][१५][१६]
संदर्भ
संपादन- ^ Maharashtra Online "Members of the Legislative Assembly: Maharashtra" Archived 7 May 2013 at the Wayback Machine.. Retrieved 22 June 2013.
- ^ "Baba Siddique announcement regarding resignation from INC".
- ^ "Baba Siddique X announcement regarding joining NCP".
- ^ Mallick, India TV News; Mallick, India TV (12 October 2024). "Baba Siddique, who was shot at in Mumbai, dies, confirms Lilavati Hospital". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 12 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "Politician Baba Siddique Known for Grand Bollywood Iftar Parties Shot Dead!". outfable.com (इंग्रजी भाषेत). 13 October 2024 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Maharashtra Ex Minister Baba Siddique Shot At In Mumbai". NDTV.
- ^ "NCP leader Baba Siddique succumbs to gunshot injuries in Mumbai; 'lost a good friend', says Ajit Pawar". द टाइम्स ऑफ इंडिया. 12 October 2024. ISSN 0971-8257. 12 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "Baba Siddique Murder Live Updates: Cops confirm gangster Lawrence Bishnoi's involvement in NCP leader's killing, MLA son Zeeshan refuses nod to postmortem". The Indian Express.
- ^ "Strongman To Bollywood Mediator, Baba Siddique Beyond Lavish Iftar Parties". ndtv.
- ^ "Baba Siddique murder accused found hiding in bushes before arrest". इंडिया टुडे. 13 October 2024. 13 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "Baba Siddique killer's mother, grandmother break silence: 'Kill him, we have nothing to do...'". Mint. 13 October 2024. 13 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "Lawrence Bishnoi's Gang Claims Responsibility For Baba Siddique's Murder". NDTV.com. 13 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "Baba Siddique shot dead: 'Probing Lawrence Bishnoi gang involvement, was given Y-category protection'". द टाइम्स ऑफ इंडिया. 13 October 2024. ISSN 0971-8257. 13 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "Baba Siddique murder: Who is Lawrence Bishnoi, jailed gangster said to be involved in NCP leader's killing?". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 13 October 2024. 13 October 2024 रोजी पाहिले.
- ^ Dalvi, Vinay; Pathak, Manish (15 October 2024). "Baba Siddique killing: Mumbai cops fan out across states to nail assassins". हिंदुस्तान टाइम्स. 15 October 2024 रोजी पाहिले.
- ^ Mutha, Snehal (14 October 2024). "Baba Siddique murder case: third accused sent to police custody till October 21". द हिंदू. 15 October 2024 रोजी पाहिले.