लॉरेन्स बिश्नोई

भारतीय गुन्हेगार

लॉरेन्स बिश्नोई (जन्म:१२ फेब्रुवारी, १९९३) हा एक भारतीय गुंड आहे.[] त्याच्यावर खून आणि खंडणीचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत. तथापि त्याच्या वरील कोणतेही गुन्हे सिद्ध झाले नसून त्याने स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत.[][] त्याची टोळी देशभरातील ७०० शूटर्सशी संलग्न असल्याचा संशय आहे.[][] तो सध्या तिहार तुरुंगात कोठडीत आहे.

लॉरेन्स बिश्नोई
जन्म

१२ फेब्रुवारी, १९९३ (1993-02-12) (वय: ३१)

[]
फिरोजपूर जिल्हा
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कायद्याची पदवी
प्रशिक्षणसंस्था पंजाब विद्यापीठ
पेशा गुन्हेगारी
कारकिर्दीचा काळ २०१० ते आजतागायत
प्रसिद्ध कामे सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, सिद्धू मूस वाला ची हत्या, सुखदुल सिंगची हत्या

प्रारंभिक जीवन

संपादन

लॉरेन्स बिश्नोई चा जन्म १२ फेब्रुवारी १९९३ रोजी पंजाबमधील फिरोजपूर येथील एका गावात झाला.[][] त्याचे वडील हरियाणा पोलिसात प्रथम पोलीस हवालदार होते. १९९७ मध्ये त्यांनी पोलीस दल सोडले आणि ते शेती करू लागले. २०१० मध्ये बिश्नोई ने १२ वीपर्यंतचे शिक्षण अबोहरमध्ये घेतले. तो २०११ मध्ये पंजाब युनिव्हर्सिटी कॅम्पस स्टुडंट्स कौन्सिलमध्ये सामील झाला, जिथे तो गोल्डी ब्रार (खरे नाव सतींदर सिंग) या गुंडाच्या संपर्कात आला. हे दोघे मिळून विद्यापीठाच्या राजकारणात गुंतले आणि गुन्हे करू लागले.[] पंजाब विद्यापीठातून त्यांनी एलएलबी पूर्ण केले.[]

गुन्हेगारी कारकीर्द

संपादन

लॉरेन्स बिश्नोईने चंदीगडच्या डीएव्ही स्कूलमधून बारावीचे शिक्षण घेतले आहे. २००८ मध्ये, त्याने "सोपू" या विद्यार्थी संघटनेच्यावतीने शाळेत विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली, ज्यामध्ये तो पराभूत झाला. या निवडणुकीमुळे बिश्नोई आणि त्याचा पराभव करणाऱ्या विरुद्ध पक्षात वैर निर्माण झाले. एकदिवस दोन्ही टोळ्या दरम्यान गोळीबार देखील झाला. या घटनेने बिश्नोईचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. लॉरेन्सला ओळखणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, विरुद्ध पक्षाने कट करून लॉरेन्सच्या मैत्रिणीची हत्या केली. या दोन कारणाने बिश्नोई गुन्हेगारी जगतात ओढला गेला असे मानले जाते.[]

२०१० ते २०१२ दरम्यान खुनाचा प्रयत्न, घुसखोरी, हल्ला आणि दरोडा यासह अनेक गुन्ह्यांसाठी त्याच्याविरुद्ध अनेक प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आले. ही सर्व प्रकरणे त्यांच्या विद्यार्थी राजकारणातील सहभागाशी संबंधित होती. चंदीगडमध्ये त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या सात एफआयआरपैकी चार प्रकरणांतून तो निर्दोष सुटला आणि तीन खटले अद्याप प्रलंबित आहेत. तुरुंगात असताना बिश्नोईने तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांशी हातमिळवणी केली. सुटका झाल्यानंतर तो शस्त्र विक्रेते आणि इतर स्थानिक गुन्हेगारांशी भेटला. पंजाब विद्यापीठातील शिक्षणादरम्यान त्याची टोळीत अजून वाढ झाली.[]

२०१३ मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर, त्याने मुक्तसरमधील सरकारी कॉलेजच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार आणि लुधियाना महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. बिष्णोई अनेकदा अज्ञातवासात गेला. २०१३ नंतर तो दारूच्या व्यवसायात उतरला. त्याने आपल्या टोळीतील खुन्यांनाही आश्रय दिला होता. २०१४ मध्ये त्याची राजस्थान पोलिसांशी सशस्त्र चकमक झाली आणि त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. तेथून त्याने खून आणि साक्षीदारांच्या हत्या करण्याचे कट रचण्यास सुरुवात केली.[]

गँगस्टरमधून राजकारणी झालेल्या जसविंदर सिंग उर्फ रॉकीशी त्याची मैत्री झाली. रॉकीच्या हाताखाली तो भरतपूर राजस्थानमध्ये सक्रिय राहिला. रॉकीची २०१६ मध्ये जयपाल भुल्लरने हत्या केली होती, भुल्लरची २०२० मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.[]

काही गंभीर सहभाग

संपादन

सलमान खान

संपादन

२०१८ मध्ये, बिश्नोईचा जवळचा सहकारी, संपत नेहरा, याने कथितपणे सलमान खानच्या निवासस्थानाची रेकी केली. त्याच्या म्हणण्यानुसार काळवीट शिकार प्रकरणात सहभागी असलेल्या सलमान खानची हत्या करण्याचे काम त्याला देण्यात आले होते. या मागील कारण म्हणजे, बिश्नोई समाज काळ्या हरणाच्या प्रजातीला पवित्र मानतो.[][][]

सिद्धू मूस वाला यांची हत्या

संपादन

२९ मे २०२२ रोजी पंजाबी गायक सिद्धू मूस वाला यांची पंजाबमधील मानसा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली.[] हत्येनंतर काही तासांनी, गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ब्रारने स्वीकारली होती. गोल्डीने बिश्नोईसोबत हा कट रचल्याचे म्हणले होते. या गोळीबारात बिष्णोईच्या टोळीचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी देखील वर्तवली. यावेळी बिष्णोई तिहार तुरुंगात होता.[१०][] दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला या तपासासाठी बिश्नोईची ५ दिवसांची कोठडी मिळाली होती.[११]

मूस वालाच्या हत्येनंतर लगेचच, बिश्नोईने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली की त्याला पंजाब पोलिसांच्या बनावट चकमकीची भीती वाटत होती. परंतु नंतर त्याने दिल्ली उच्च न्यायालयाकडून ही याचिका मागे घेतली आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.[१२][१३]

सुखदूल सिंग

संपादन

२१ सप्टेंबर २०२३ रोजी बिश्नोईने खलिस्तानी दहशतवादी सुखदूल सिंगच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. मुळात सुखदूल सिंग उर्फ सुखा दूनिके हा दविंदर बंबीहा टोळीशी संबंधित असून बिष्णोईच्या टोळी सोबत यांचे टोळीयुद्ध नेहमी चालते.[१४][१५] तथापि साबरमती सेंट्रल जेलच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला. त्यांच्या म्हणण्यानुसार, बिष्णोई हा जेल मध्ये कडक सुरक्षेत असून त्याने या बाबत कुणाला आदेश दिल्याची शक्यता नसून, उलट त्याच्या नावे फेसबुकवर अनेक खोटी खाती आहेत. यापैकी एका खात्यावर हा दावा करण्यात आला आहे आणि हे कपोकल्पित आहे.[१६]

सुखदेव सिंग गोगामेडी

संपादन

५ डिसेंबर २०२३ रोजी जयपूरमध्ये करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिष्णोई टोळीने रोहित गोदारामार्फत हत्येची जबाबदारी स्वीकारली.[१७][१८][१९]

बाबा सिद्दीकी

संपादन

बिष्णोई टोळीने १२ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आणि सलमान खानशी जवळचे नाते सांगून.[२०][२१] मुंबई पोलिसांनी बिश्नोईचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २६८ चा हवाला देत तो नाकारण्यात आला.[२२]

जागतिक सहभाग

संपादन

खलिस्तान विरोधी कारवाया

संपादन

राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) अहवालात बिश्नोई आणि गोल्डी ब्रार हे खलिस्तान समर्थक संघटनांच्या विरोधात कार्यरत आहे. यामुळे खलिस्तान समर्थक नेत्यांवरील हल्ल्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय निर्माण झाला आहे.

कॅनडाचे आरोप

संपादन

ऑक्टोबर २०२४ मध्ये, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (RCMP) ने आरोप केला की, बिश्नोईच्या टोळीसह गुन्हेगारी गटांचा वापर "भारत सरकारचे एजंट" कॅनडातील खलिस्तान समर्थक घटकांशी संबंधित व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी करत आहेत.[२३][२४][२५] वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात असे लिहिले आहे की भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांच्या कॅनडाच्या समकक्षासोबत सिंगापूर येथे भेट घेतली, जिथे कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी खलिस्तान समर्थक नेता हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येशी बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे आरोप केले.[२६][२७]

आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहभाग

संपादन

बिश्नोई टोळीत भारतातील ५ राज्यांमधील ७०० नेमबाज काम करत आहेत आणि विशेष म्हणजे भारताबाहेरही त्यांची पोहोच आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c "Who is Lawrence Bishnoi, whose gang shot Sidhu Moose Wala".
  2. ^ a b c "Who is Lawrence Bishnoi whose gang claimed to have killed Sidhu Moose Wala". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-05-31. 2022-05-31 रोजी पाहिले.
  3. ^ "Notorious gangster threatens to kill Salman Khan". The Asian Post. 2018-01-08. 2021-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-19 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Lawrence Bishnoi, being investigated in the Sidhu Moose Wala murder, threatened Salman Khan's life in 2018: 'Jodhpur mein hi maarenge…'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-05-31. 2022-05-31 रोजी पाहिले.
  5. ^ a b c d Anand, Jatin; Sur, Arnabjit (2022-06-02). "How Lawrence Bishnoi fell on the wrong side of the law". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2022-06-03 रोजी पाहिले.
  6. ^ a b c Ojha, Arvind (May 31, 2022). "'Will kill Salman Khan in Jodhpur': Watch Lawrence Bishnoi's threat to Bollywood star in 2018 | Video". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-05-31 रोजी पाहिले.
  7. ^ a b Chandigar, Arvind Ojha (May 30, 2022). "Who is Lawrence Bishnoi, whose gang shot Sidhu Moose Wala". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-05-31 रोजी पाहिले.
  8. ^ "चुनाव में हार और गर्लफ्रेंड की हत्या के बाद गैंगस्टर बना लॉरेंस बिश्नोई! गैंग में हैं 700 शूटर". abplive.com. २५ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.
  9. ^ "Days after his security trimmed, Congress leader Moosewala shot dead in Punjab". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-05-30. 2022-05-31 रोजी पाहिले.
  10. ^ "Five things to know about Goldy Brar, who claimed responsibility for Sidhu Moosewala's death". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-05-31. 2022-05-31 रोजी पाहिले.
  11. ^ Haider, Tanseem; Ojha, Arvind (May 31, 2022). "Delhi Police Special Cell gets 5-day custody of gangster Lawrence Bishnoi in Sidhu Moose Wala murder case". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-06-02 रोजी पाहिले.
  12. ^ "Lawrence Bishnoi moves Punjab and Haryana High Court after withdrawing plea from Delhi High Court". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2022-06-02 रोजी पाहिले.
  13. ^ "Sidhu Moose Wala murder: Lawrence Bishnoi takes back Delhi HC plea, will move Punjab high court". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-06-01. 2022-06-02 रोजी पाहिले.
  14. ^ "Two rival Punjabi gangsters claim responsibility for Sukhdool Singh's death in Canada". द इंडियन एक्सप्रेस. 21 September 2023. 21 September 2023 रोजी पाहिले.
  15. ^ "Lawrence Bishnoi claims responsibility for Khalistani terrorist Sukhdool Singh's killing in Canada". Mint. 21 September 2023. 21 September 2023 रोजी पाहिले.
  16. ^ "सुखाच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोईचा हात? फेसबुक पोस्टबाबत साबरमती तुरुंग अधिकाऱ्यांचा मोठा दावा". दैनिक लोकमत. २१ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.
  17. ^ "Rashtriya Rajput Karni Sena chief Sukhdev Singh Gogamedi shot dead in Jaipur". द टाइम्स ऑफ इंडिया. 10 December 2023. 4 May 2024 रोजी पाहिले.
  18. ^ "Karni Sena chief murder: Lawrence Bishnoi gang claims attack, protests in Jaipur". India Today (इंग्रजी भाषेत). 4 May 2024 रोजी पाहिले.
  19. ^ "'Rajasthan bandh' called today over Karni Sena chief Sukhdev Gogamedi's murder". mint (इंग्रजी भाषेत). 6 December 2023. 4 May 2024 रोजी पाहिले.
  20. ^ "'Reason for his death...': Lawrence Bishnoi gang claims responsibility for Baba Siddique's death". Business Today. 13 October 2024.
  21. ^ "Baba Siddique murder: Who is Lawrence Bishnoi, jailed gangster said to be involved in NCP leader's killing?". Financialexpress (इंग्रजी भाषेत). 13 October 2024. 13 October 2024 रोजी पाहिले.
  22. ^ "This Order Is Stopping Mumbai Police From Taking Lawrence Bishnoi's Custody". NDTV.com. 15 October 2024 रोजी पाहिले.
  23. ^ Ellis-Petersen, Hannah (15 October 2024). "Canadian police accuse India of working with criminal network to kill dissidents". द गार्डियन.
  24. ^ Kaushik, Krishn (15 October 2024). "Who is Lawrence Bishnoi, at the center of a spat between India and Canada?". Reuters.
  25. ^ "Canada-India tensions: Who is Lawrence Bishnoi, at the center of the row?". Global News (इंग्रजी भाषेत). 16 October 2024 रोजी पाहिले.
  26. ^ Miller, Greg; Shih, Gerry (14 October 2024). "Canada alleges much wider campaign by Modi government against Sikhs". The Washington Post.
  27. ^ Lakshman, Shriraam (16 October 2024). "Washington Post says Amit Shah and senior R&AW official authorised covert operations in Canada". The Hindu.