खलिस्तान
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
१९७० व ८० च्या दशकात पंजाबात शीखांचे स्वतंत्र देश अस्तित्वात यावा यासाठी चळवळ चालू झाली होती. ह्या काल्पनिक स्वतंत्र देशाचे नाव खलिस्तान असे पंजाबी भाषेतील खालसा (पवित्र) या शब्दावरून ठेवण्यात आले होते.(खालिस्तान = पवित्र भूमी). शीखांच्या या मागणीला या काळात दहशतवाद व हिंसाचाराचे स्वरूप प्राप्त झाले. या चळवळीने भारत सरकारशी एक प्रकारचे युद्ध उभे ठाकले होते. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री बियंत सिंग, जनरल अरुण श्रीधर वैद्य अश्या अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या दहशतवादाला बळी पडल्या. १९८६-८७ च्या सुमारास पंजाब पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर या खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध कारावाई केली व त्यामुळे ही चळवळ व त्याच्या संबधित दहशतवादाला आळा बसला. सध्या ही चळवळ यूके, कॅनडा इत्यादी देशात रहाणाऱ्या शीख समुदायापुरती व सांस्कृतिक चळवळ यांपुरती मर्यादित आहे. भारतात या चळवळीचे अतिशय क्रूर रूप पहावयास मिळाल्याने कोणत्याही प्रकारच्या ऊग्र खलिस्तानी चळवळीवर जगात बंदी आहे.
पहा