जाक्सन-आनहाल्ट
झाक्सन-आनहाल्ट (जर्मन: Sachsen-Anhalt) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. झाक्सन-आनहाल्टच्या भोवताली जर्मनीची नीडरझाक्सन, ब्रांडेनबुर्ग, झाक्सन व थ्युरिंगेन ही राज्ये आहेत. माक्देबुर्ग ही झाक्सन-आनहाल्टची राजधानी तर हाले हे येथील एक प्रमुख शहर आहे.
झाक्सन-आनहाल्ट Sachsen-Anhalt | |||
जर्मनीचे राज्य | |||
| |||
झाक्सन-आनहाल्टचे जर्मनी देशामधील स्थान | |||
देश | जर्मनी | ||
राजधानी | माक्देबुर्ग | ||
क्षेत्रफळ | २०,४४७.७ चौ. किमी (७,८९४.९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २३,१३,२८० | ||
घनता | ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | DE-ST | ||
संकेतस्थळ | sachsen-anhalt.de |
दुसऱ्या महायुद्धामधील नाझी जर्मनीच्या पराभवानंतर हा भूभाग सोव्हिएत संघाने ताब्यात घेतला व १९४७ साली झाक्सन-आनहाल्ट राज्याची निर्मिती केली गेली. १९५२ साली पूर्व जर्मनी मध्ये विलिन झाल्यानंतर हे राज्य बरखास्त करून दोन जिल्ह्यांमध्ये विभागले गेले. १९९० सालच्या जर्मन एकत्रीकरणानंतर सर्व राज्ये पूर्ववत केली गेली ज्यामध्ये झाक्सन-आनहाल्टला परत राज्याचा दर्झा मिळाला. एकत्रीकरणानंतर झाक्सन-आनहाल्टची कम्युनिस्ट अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली होती. परंतु जर्मन सरकारने येथील पायाभुत सुविधा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यामुळे सध्या येथील बेरोजगारी आटोक्यात आली आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-07-19 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |