ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त
(ज्यूइश स्वायत्त ओब्लास्त या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त (रशियन: Еврейская автономная область ; यिद्दिश: ייִדישע אווטאָנאָמע געגנט , यिद्दिश आव्तोनोम गेंग्ट ;) हे रशियन संघाच्या अतिपूर्व जिल्ह्यातील चीन देशाच्या सीमेवरील एक स्वायत्त ओब्लास्त आहे. हे रशियाचे एकमेव स्वायत्त ओब्लास्त आहे. जोसेफ स्टालिनाने इ.स. १९३४ साली ह्या ओब्लास्ताची स्थापना केली. ह्या भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती करून राहिलेल्या ज्यू धर्मीय नागरिकांना आपली संस्कृती व धर्म जोपासता यावा हा ज्यूईश ओब्लास्तच्या स्थापनेमागील मूळ हेतू होता.
ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त Еврейская автономная область | |||
रशियाचे ओब्लास्त | |||
| |||
ज्यूईश स्वायत्त ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान | |||
देश | रशिया | ||
केंद्रीय जिल्हा | अतिपूर्व | ||
राजधानी | बिरोबिद्झान | ||
क्षेत्रफळ | ३६,००० चौ. किमी (१४,००० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १,९०,९१५ | ||
घनता | ५ /चौ. किमी (१३ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | RU-YEV | ||
संकेतस्थळ | http://www.eao.ru/eng/ |
रशियाच्या खबारोव्स्क क्राय व आमूर ओब्लास्त या राजकीय विभागांना, तसेच चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या हैलोंगच्यांग प्रांताला ज्यूइश स्वायत्त ओब्लास्ताच्या सीमा भिडल्या आहेत. बिरोबिद्झान येथे या ओब्लास्ताची प्रशासकीय राजधानी आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ (रशियन मजकूर)
- ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त याची माहिती देणारे संकेतस्थळ (रशियन मजकूर)