Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जॉर्ज मिकेश (इंग्लिश: George Mikes, हंगेरियन: Mikes György) (फेब्रुवारी १५, १९१२ - ऑगस्ट ३०, १९८७) हा जन्माने हंगेरियन असलेला इंग्लिश भाषेतील लेखक होता.

जॉर्ज मिकेश
जन्म नाव जॉर्ज मिकेश
जन्म फेब्रुवारी १५, १९१२
सिक्लोस, हंगेरी (तत्कालीन ऑस्ट्रिया-हंगेरीचे साम्राज्य)
मृत्यू ऑगस्ट ३०, १९८७
लंडन, इंग्लंड
राष्ट्रीयत्व हंगेरियन (जन्माने)
ब्रिटिश (नागरिकीकरणाने)
कार्यक्षेत्र इंग्लंड
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार विनोदी प्रवासवर्णने/देशवर्णने, टीका, कादंबरी
विषय इंग्रजी जीवनपद्धती, विविध देश, टी़का, मीमांसा
प्रसिद्ध साहित्यकृती हाउ टू बी ऍन एलियन (इंग्रजी जीवनपद्धतीचे आगंतुकाच्या दृष्टीतून विनोदी वर्णन)

हाउ टू बी गॉड ('परमेश्वर' या संकल्पनेच्या घडणुकीचा विनोदी परंतु तितकाच तर्कशुद्ध परामर्श)

हाउ टू बी सेवन्टी (आयुष्याची सत्तरी गाठल्यावर गतायुष्याचा परामर्श घेणारे आत्मचरित्रवजा चिंतन)

स्वित्झर्लंड फॉर बिगिनर्स, बूमरॅंगः ऑस्ट्रेलिया रीडिस्कवर्ड इ. (विविध देशांची वर्णने)

त्सि-त्सा: द बायोग्रफी ऑफ अ कॅट (जॉर्ज मिकेशच्या पाळीव मांजरीचे चरित्र)

द स्पाय हू डाइड ऑफ बोअरडम (विनोदी कादंबरी. इंग्लंडमधील एका सोविएत गुप्तहेराची कथा. काही अंशी 'जेम्स बॉंड'मालिकेतील कथावैशिष्ट्यांची खिल्ली उडवणारी म्हणता यावी.)

हाउ टू बी पुअर ('पैसा' या विषयावरील लेखकाचे मौलिक विचार आणि विवेचन, विनोदी शैलीत.)