जॉक कार्तिये (फ्रेंच: Jacques Cartier; ३१ डिसेंबर १४९१ - १ सप्टेंबर १५५७) हा एक फ्रेंच खलाशी व शोधक होता. उत्तर अमेरिकेतील कॅनडापर्यंत पोहोचलेला पहिला युरोपियन शोधक हा मान त्याला जातो. इ.स. १५३४ साली कार्तिये सेंट लॉरेन्स नदीच्या मुखापाशी पोचला व तेथून त्याने आजच्या क्वेबेक सिटीमॉंत्रियाल येथील स्थानिक इरुक्वाय लोकांच्या वसाहती शोधून काढल्या.

जॉक कार्तिये
Jacques Cartier 1851-1852.jpg
जन्म ३१ डिसेंबर, इ.स. १४९१
सेंत मालो, ब्रत्तान्य
मृत्यू १ सप्टेंबर, इ.स. १५५७
सेंत मालो, ब्रत्तान्य
राष्ट्रीयत्व फ्रेंच
प्रसिद्ध कामे उत्तर अमेरिकाकॅनडाला पोचलेला पहिला युरोपीय
स्वाक्षरी

कार्तियेने त्यानंतर कॅनडाच्या दोन वाऱ्या केल्या ज्यांदरम्यान फ्रेंचांनी स्थानिक लोकांसोबत संबंध प्रस्थापित केले.


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: