जुम्मापट्टी रेल्वे स्थानक

जुम्मापट्टी हे भारतातील माथेरान डोंगरी रेल्वेवरील एक स्थानक आहे. जुम्मापट्टी रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील माथेरान डोंगरी रेल्वे या अरुंदमापी लोहमार्गावरील एक स्थानक आहे.

नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबा घेतात. परंतु हे स्थानक एक 'तांत्रिक थांबा' असून येथे तिकीट खिडकी नाही. या स्थानकापासूनचे किंवा या स्थानकापर्यंतचे तिकीट उपलब्ध होत नाही.

जुम्मापट्टी
मध्य रेल्वे स्थानक
माथेरान डोंगरी रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता जुम्मापट्टी, रायगड जिल्हा
मार्ग माथेरान डोंगरी रेल्वे
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत JTT
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे