अमन लॉज रेल्वे स्थानक

अमन लॉज रेल्वे स्थानक हे भारतातील माथेरान डोंगरी रेल्वेवरील एक स्थानक आहे. अमन लॉज रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील माथेरान डोंगरी रेल्वे या अरुंदमापी लोहमार्गावरील एक स्थानक आहे.

अमन लॉज
मध्य रेल्वे स्थानक
माथेरान डोंगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता माथेरान, रायगड जिल्हा
मार्ग माथेरान डोंगरी रेल्वे
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत AMNA
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे

हे स्थानक माथेरान पठारावर असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामालयापासून तसेच दस्तुरी नाक्यापासून जवळच आहे. नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबा घेतात. परंतु या गाड्यांसाठी हे स्थानक एक 'तांत्रिक थांबा' आहे. 'माथेरान-नेरळ' गाड्यांसाठी माथेरानहून या स्थानकाचे तिकीट मिळत नाही तसेच 'नेरळ-माथेरान' गाड्यांसाठी नेरळहून या स्थानकाचे तिकीट मिळत नाही. नेरळहून माथेरानचे तिकीट घेऊन पर्यटक या ठिकाणी उतरतात. अमन लॉज - माथेरान दरम्यान शटल रेल्वे सेवा उपलब्ध असून येथील तिकीट खिडकीवर फक्त याच गाड्यांचे माथेरानसाठीचे तिकीट उपलब्ध होते.

नेरळहून रस्तेमार्गाने माथेरानला आल्यास 'दस्तुरी नाका'पर्यंतच वाहनांना परवानगी आहे. दस्तुरी नाक्यापासून या स्थानकावर आल्यास 'अमन लॉज - माथेरान' या रेल्वेने माथेरानपर्यंत जाता येते.