जम्मू तावी रेल्वे स्थानक
भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू ह्या शहरामधील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक
(जम्मूतवी या पानावरून पुनर्निर्देशित)
जम्मू तावी रेल्वे स्थानक हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू ह्या शहरामधील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागाच्या अखत्यारीत येणारे जम्मू तावी हे राज्यामधील सर्वात मोठे स्थानक असून येथून दिल्ली व दिल्लीच्या दक्षिणेकडील अनेक मोठ्या शहरांसाठी गाड्या सुटतात. वैष्णोदेवीला जाणाऱ्या यत्रिकांसाठी कटरा येथे २०१४ साली श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक हे स्थानक खुले करण्यात आले. ह्यामुळे जम्मूपर्यंत धावणाऱ्या अनेक गाड्या कटरापर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
जम्मू तावी भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
येथे उभी असलेली जम्मू तावी राजधानी एक्सप्रेस | |
स्थानक तपशील | |
पत्ता | जम्मू |
गुणक | 32°42′22″N 74°52′49″E / 32.70611°N 74.88028°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ३४३.८ मी |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९७५ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | JAT |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | उत्तर रेल्वे |
स्थान | |
|
काश्मीर रेल्वे चालू झाल्यानंतर जम्मू तावी स्थानकाचे महत्त्व वाढले आहे. श्रीनगर मार्गे बारामुल्ला ते जम्मू ह्या मार्गावरील जम्मू तावी हे अखेरचे स्थानक असेल.