जगदीप धनखड

(जगदीप धनखर या पानावरून पुनर्निर्देशित)

जगदीप धनखड (जन्म १८ मे १९५१) हे भारताचे वर्तमान आणि १४ वे उपराष्ट्रपती आहेत.[] ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. याआधी त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते.[]

जगदीप धनखर

कार्यकाळ
३० जुलै २०१९[] – १८ जुलै २०२२
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
मागील केशरीनाथ त्रिपाठी

संसदीय कामकाज राज्यमंत्री
कार्यकाळ
१९९० – ९१
पंतप्रधान चंद्रशेखर

कार्यकाळ
१९९३ – १९९८
मतदारसंघ किशनगड, राजस्थान

कार्यकाळ
१९८९ – १९९१
मागील मोहम्मद अयुब खान
पुढील मोहम्मद अयुब खान
मतदारसंघ झुनझुनू

जन्म १८ मे, १९५१ (1951-05-18) (वय: ७३)
झुनझुनू, राजस्थान
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
व्यवसाय राजकारण
धंदा वकिली

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

संपादन

धनखर यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थान राज्यातील किठाना या छोट्या गावात झाला. धनखर यांनी किठाणा गावच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपले शालेय शिक्षण सैनिक स्कूल, चित्तौडगढ येथून पूर्ण केले आणि त्यानंतर राजस्थान विद्यापीठ, जयपूरमधून पदवी प्राप्त केली.[] धनखर यांनी १९७९ मध्ये सुदेश धनखड यांच्याशी लग्न केले आणि त्यांना कामना ही मुलगी आहे.

कारकीर्द

संपादन

१९९० पासून, धनखड हे प्रामुख्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकीली करत होते. जनता दलाचे पक्षाकडून ९व्या लोकसभेत १९८९-९१ दरम्यान राजस्थानमधील झुनझुनू (लोकसभा मतदारसंघ) येथून ते खासदार होते. ते १९९३-९८ दरम्यान राजस्थानच्या १० व्या विधानसभेत किशनगड, राजस्थान येथून विधानसभेचे माजी सदस्य (आमदार) होते आणि राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशन, जयपूरचे माजी अध्यक्ष.[] ३० जुलै २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. नंतर १७ जुलै २०२२ रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झाल्यानंतर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ https://www.ndtv.com/india-news/jagdeep-dhankar-to-be-sworn-in-as-new-west-bengal-governor-on-july-30-2075543
  2. ^ "Jagdeep Dhankar : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांचा मोठा विजय, मार्गारेट अल्वा पराभूत". Maharashtra Times. 2022-08-06 रोजी पाहिले.
  3. ^ "Our Governor: Raj Bhavan, West Bengal, India". Raj Bhavan, West Bengal, India. 15 May 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Jagdeep Dhankhar". 12 March 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "Our Governor: Raj Bhavan, West Bengal, India". Raj Bhavan, West Bengal, India. 15 May 2021 रोजी पाहिले.