चितळी
महाराष्ट्रातले एक गाव
चितळी हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता या तालुक्यातील आहे.
?चितळी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | अहमदनगर |
लोकसंख्या | ४,६०९ (२०११) |
विधानसभा मतदारसंघ | कोपरगाव विधानसभा |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 413723 • +०२४२३ • MH-१७ (श्रीरामपूर) |
संकेतस्थळ: चितळी ग्रामपंचायत |
स्थान
संपादनचितळी गाव राहाता तालुक्याच्या पुर्वेस वसलेले आहे आणि श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेलगत आहे. वाकडी, जळगाव, निमगाव खैरी ही लगतची गावे आहेत.
लोकसंख्या
संपादन२०११ च्या जनगणनेनुसार चितळीची लोकसंख्या ४६०९ असुन २४१५ पुरुष व २१९४ स्त्रिया आहेत. गावाची साक्षरता ७२ % आहे.
अर्थव्यवस्था
संपादनगावात मुख्यत्वे शेती आणि संबंधित कामे केली जातात. तसेच गावात जॉन डिस्टीलरीज मद्यनिर्मिती कारखाना आहे.
परिवहन
संपादनरस्ते
संपादनचितळी राहाता आणि निमगाव खैरीस जिल्हा मार्गाने जोडलेले आहे.
लोहमार्ग
संपादनचितळी गावात मध्य रेल्वे स्टेशन आहे.
हवाई
संपादनशिर्डी विमानतळ चितळीच्या नजीकचे विमानतळ आहे.