वाकडी हे गाव अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता या तालुक्यातील आहे. वाकडी गाव खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

  ?वाकडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ४०′ ४४″ N, ७४° ३४′ ४६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा अहमदनगर
लोकसंख्या ११,९३० (२०११)
विधानसभा मतदारसंघ कोपरगाव विधानसभा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 413719
• +०२४२३
• MH-१७ (श्रीरामपुर)

लोकसंख्या संपादन

२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ११९३० आहे. त्यापैकी ६१८५ पुरुष व ५७४५ स्त्रिया आहेत.

अर्थव्यवस्था संपादन

बहुतेक लोक शेती व संबंधित कामे करतात. गावातून जाणाऱ्या कालव्यामुळे बरेचसे क्षेत्र सिंचित झालेले आहे. सहकारी साखर कारखाना लगतच्या गावात स्थित आहे. काही काळापूर्वी गावात ऊस लागवड मोठया प्रमाणावर केली जायची परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये यात घट झाली आहे.

परिवहन संपादन

रस्ते संपादन

वाकडी गाव श्रीरामपुर व शिर्डीला शिर्डी - शिंगणापूर राज्यमार्गने जोडलेले आहे.

रेल्वे संपादन

चितळी रेल्वे स्टेशन हे नजीकचे रेल्वे स्टेशन आहे.

हवाई संपादन

शिर्डी विमानतळ गावापासून २७ किमीवर स्थित आहे.