चर्चा:संभाजी ब्रिगेड
या लेखात वाद घालून याचा कचरा करू नये. यातला संधर्भ खरा आहे. संपादन करताना इग्रजी विकिपीडियाचा वापर करून मराठीत भाषांतर करावे. जरी हा एक भेदभावी संघटने बदल असेल लेख असेल तरी खरे तेच लिहावे. काही काही सदस्या इथे संभाजी ब्रिगेड फार पुण्यवान आहे असे दाखवले होते. ते खोटे होते ते या लेखातून काढण्यात आले आहे. ब्लोग्सच्या मदतीने केलेले संपादन १०० टक्के खरे मानले जाऊ शकत नाही. कारण ब्लोग्स खोटे पण असू शकतात.
हा लेख व्यक्तिगत मतांनी भरलेला वाटतो... पुनर्लेखनाची नितांत गरज भासते...
आपला,
विशुभाऊ... संभाजी ब्रिगेड बाबत ब्राम्हणी मानसिकतेचे लोक चुकीच्या पद्धतीने बदल करीत आहेत. ब्रिगेड आक्रमक आणि वैचारिक संघटना आहे
समाजाचे खरे प्रबोधन करीत आहेत. मराठी समाजाची अस्मिता म्हणजे ब्रिगेड आहे
स्थानांतरित मजकूर
संपादनSambhaji Brigade या पानावरील मजकूर. योग्य तितका लेखात हलवावा.
संभाजी ब्रिगेड हि संघटना सुमारे १९९९ च्या सुमारास स्थापन झाली. तिचा उद्देश मराठा समाजातील युवकांना एकत्र करणे हा होता, परंतु नंतर शिवधर्म परिषद व जीजावू ब्रिगेड ह्या संघटनाही या मुख्य संघटनेशी जोडल्या गेल्या. कोकाटे व खेडेकर नामक व्यक्ती या संघटनेचे अध्यक्ष आहेत. पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर या संघटनेने हल्ला केला व आपले खरे विध्वंसक स्वरूप दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेस व अजित दादा पवार यांच्या हातातील कळसूत्री बाहुल्याप्रमाणे हि संघटना वागत असून दादागिरी व गुंडगिरी ची भाषा केली जाते.छत्रपती शिवाजी राजांचे नाव घेत फक्त ब्राह्मणद्वेष करून आपले अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न हि संघटना करत आहे. दादोजी कोंडदेव यांचा पुणे येथील पुतळा हलविणे, सावरकर व रामदास अशा ब्राह्मण नेत्यांची बदनामी करणे ,विकृत साहित्य प्रकशित करणे , इंटरनेट व अन्य माध्यमातून ब्राह्मणद्वेष पसरवणे असल्या भाकड व निरुपयोगी कामात या मंडळीना फारच मोठी फुशारकी वाटत आहे.
अभय नातू २३:१७, ११ जुलै २०११ (UTC)
हा लेख संभाजी ब्रिगेड पुण्यवान आहे आशा प्रकारे लिहीला आहे. हे चुकीचे आहे. म्हणुन हा लेखात बदल करण्याची गरज आहे. वाचक लोकानी हा लेख वाचुन गैरसमज करु नये.
हा लेख लिहिणाऱ्यांचे मराठी फार वाईट आहे. लेखाला अनुल्लेखाने मारावे....J (चर्चा) २१:०६, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)
संभाजी ब्रिगेड ही दहशतवादी संघटना[ संदर्भ हवा ]
संभाजी ब्रिगेड हि संघटना कोण्या एका जातिविरुद्ध नसून मनुवादी प्रवृत्तीविरूद्ध आहे... आजकाल कोणीपण उठतो..ब्राम्हण जातीला शिव्या देतो व स्व:ताल संभाजी ब्रिगेडचा म्हणूवन घेतो...अशा कार्यकर्त्यानीं सेवा संघाची पुस्तके वाचावीत... पुरोगामी विचारसरणी,युवकाचां सर्वागीण विकास यावर ही संघटना आधारली आहे... संभाजी ब्रिगेडबद्दल चालवलेला हा जहरी प्रचार थांबवावा...संभाजी ब्रिगेड हि संघटना विवेकवाद,प्रयत्नवाद ,विज्ञानवादावर आधारलेली आहे. कोण्या जातीच्या द्वेषावर नाही.युवकांना दिशा देणारी संघटना… युवकांना पुस्तक वाचायला लावणारी संघटना… शस्त्राऐवजी शास्त्र शिकवणारी संघटना..हजारो लेखक,वक्ते,समाजसेवक तयार करणारी संघटना...महाराष्ट्रात लोकसंख्येने सर्वात असलेल्या मराठा समाजाला फुले शाहु आंबेडकरांच्या विचारांची खरी ओळख जर कोणी करुन दिली असेल ते म्हणजे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने ...महाराष्ट्रात आता जातीय दंगलीचा वणवा पेटत नाही कारण मराठा सेवा संघाच्या 'पुरुषोत्तमानं' ही आग विझविण्याचं काम केलं. पैसा खिशात नसतो तर डोक्यात असतो, डोक्यातला पैसा खिशात कसा आणायचा या संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या शिकवणुकीमुळे आज अनेक कार्यकर्ते स्वबळावर उभे राहिलेत.नवनवीन वक्ते,लेखक,किर्तनकार,प्रबोधनकार मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडमुळे तयार झालेत....
संबंधीत चर्चेची नोंद
संपादन- एका सदस्याने दुसऱ्या सदस्याच्या पानावर केलेल्या चर्चेची नोंद संदर्भा करिता.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:०५, १७ जून २०१३ (IST)
हा लेख सुरक्षित करावा
संपादन@अभय नातू:@Tiven2240: सतत ह्या लेखामध्ये मजकूराशी आणि संदर्भाशी, निनावी सदस्यांकडून प्रवेश न करताच बदल केले जात आहेत. म्हणून मी प्रचालकांना हा लेख संरक्षित करण्याची विनंती करत आहे. @अभय नातू:@Tiven2240: पुऩ्हा एकदा मी विनती करत आहे हा लेख संरक्षित करावा ह्यात खुपच उत्पात होत आहे. WikiSuresh (चर्चा) १७:५२, १७ जुलै २०१८ (IST)
- @Sureshkhole: निनावी हे उत्पात करत आहेत असे कसे म्हणतात? यावर स्पष्टीकरण द्यावे आपण चेकउझर (checkuser) चेक केले आहे का? उत्पात साठी हा पान अर्ध सुरक्षित झाले. आहे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:२४, १७ जुलै २०१८ (IST)
- मी आवृत्या परतवलेल्या आहेत, इतिहासात त्यांनी काय संपादने संभाजी ब्रिगेड ह्या पानावर केली आहेत हे पहावे.
- अपमानास्पद मजकूर भरणे आणि अस्तित्त्वात असलेला संदर्भासहित चांगला मजकूर संपुर्णपणे काढून टाकणे हा माझ्यासाठी उत्पात आहे.
- आणि फ़क्त आय. पी. पत्ताच मला दिसत असल्याने तो सदस्य माझ्यासाठी निनावी आहे.
- ह्या उपर आपल्याला काय स्वरुपाचे स्पष्टीकरण हवे आहे हे मला कळलेले नाही. WikiSuresh (चर्चा) १८:४९, १७ जुलै २०१८ (IST)
@अभय नातू आणि V.narsikar:
- ह्या वरील चर्चेवरुन टायवीन यांना मराठी समजण्यात मोठी अडचण आहे हे स्पष्ट आहे.
- या पानावर मी ह्या अंकपत्यावरुन होणारा उत्पात आणि विस्तॄत नोंद दिलेली आहे.
- आता एखाद्या अंकपत्त्यावरुन आणि तेही इतक्या खालच्या थराला जाऊन उत्पात होत असेल आणि
- तो मी नोंदवत असेल, त्यात मी काय सांगत आहे हे टायवीन यांना कळत नसल्यास शिवाय.
- माझ्यावर वैयक्तीक आरोप केल्याचा आरोप केला जात आहे, तो ही मी कोणावर वैयक्तीक आरोप केला हे कदाचित टायवीय यांनाच माहित असावे कारण मला माहित नाहीये.
- शिवाय निनावी सदस्य म्हणजे नक्की काय हे टायवीन यांना आता कोण समजावून सांगणार हा मी मला पडलेला मोठा प्रश्न आहे. WikiSuresh (चर्चा) २०:०२, १७ जुलै २०१८ (IST)
@अभय नातू आणि V.narsikar:
- मी उत्पात उलटवण्याची विनंती केली हॊती आणि अंकपत्ता अवरुध्द करण्याचीही.
- वर दिलेल्या अंकपत्त्यांनी केलेला उत्पात आपल्याला पहाता येईल.
- त्याऐवजी काही एक न करता टायवीन यांनी माझ्याबर आरोप केले आणि आता त्याबद्दल तक्रार केल्यावर ह्या चर्चापानावरुन स्वत:च्या अज्ञानाचे भांडे फ़ोडणारा मजकूर प्रचालकपदाचा गैरवापर करुन काढून टाकला आहे.
- ह्यात दु:ख ह्याचे की, अजुनही वर उल्लेखलेल्या अंकपत्त्यावरुन झालेले उत्पात अजुनही परतवलेले नाहीत ज्याच्यासाठी मी ह्या संवादाची सुरूवात केली. WikiSuresh (चर्चा) २१:१०, १७ जुलै २०१८ (IST)
संभाजी ब्रिगेड लेखात कोणी तरी चुकीच्या पद्धतीने माहिती टाकीत आहेत युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांना एकेरी भाषेत उल्लेख आहे. कोणी तरी सनातनी व्यक्ती द्वेषातून चुकीचे बदल करीत आहेत संभाजी ब्रिगेड आक्रमक आणि वैचारिक संघटना शे. चुकीचे बदल केल्यास उद्रेक होऊ शकतो काळजी घेणे गरजेचे.