संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील एक मदरश्याच्या पैशावर चालणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. संभाजी महाराज यांचे नाव या संघटनेला दिले आहे. पुरुषोत्तम खेडेकर हा या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे छत्रपती शिवरायांचा खोटा आणि जातीयवादी इतिहास पसरवण्याचा काम ही संघटना करते,ही संघटना हिंदू द्वेष व ब्राह्मण द्वेष समाजात पसरवण्याचा काम करते मराठ्यांच्या नावाखाली या संघटनेत फुटीरतावादी विचारांचे लोक कार्य करतात,पुरुषोत्तम खेडेकर ला ब्राह्मण समाजा विरोधात केलेल्या लिखाणासाठी रत्नागिरी जिल्हा न्यायालयात माफी मागून पुस्तक मागे घ्याव लागल लागलं होतं संभाजी ब्रिगेडचे विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे आहेत. मराठा सेवा संघाच्या या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.[१]

ब्रगेडची कृत्ये

  • भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला : जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील जिजाबाई यांच्या तथाकथित बदनामीचा संशय घेऊन संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७२ तरुणांना पोलिसांनी अटक केली. २०१७ साली या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच ७२ जणांवर आरोप सिद्ध न करता आल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले..[२]
     
    भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केला होता. त्यानी ही संस्था जाळली होती.
  • रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला.
     
    रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा. हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तोडला होता.

संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता.[३] .

  • पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयावर केलेला हल्ला: ब्रिगेडचे ४० ते ५० लोक कार्यालयात घुसले आणि तोडफोड केली.[४]
  • महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील य़ांच्यावर हल्ला: शिवाजी : द हिंदू किग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली, त्यावेळेला ब्रिगेडच्या लोकांनी आर. आर. पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.[५]
  • बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाईफेक[६]
  • पुण्याच्या संभाजी उद्यानातला राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकला.

संदर्भ

  1. ^ ""संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट". www.esakal.com (mr मजकूर). 2018-04-29 रोजी पाहिले. 
  2. ^ "भांडारकर हल्ला: 'ब्रिगेड'चे सर्व कार्यकर्ते निर्दोष -Maharashtra Times". Maharashtra Times (mr मजकूर). 2017-10-27. 2018-03-19 रोजी पाहिले. 
  3. ^ "73 held for removing Shivaji dog’s statue from Raigad fort | Latest News & Updates at Daily News & Analysis". dna (en-US मजकूर). 2012-08-03. 2018-03-19 रोजी पाहिले. 
  4. ^ "News18.com: CNN-News18 Breaking News India, Latest News, Current News Headlines". News18 (en-US मजकूर). 2018-03-19 रोजी पाहिले. 
  5. ^ "Sambhaji Brigade targets home min – Times of India". The Times of India. 2018-03-19 रोजी पाहिले. 
  6. ^ "ink-babasaheb-purandare | Loksatta". www.loksatta.com (mr-IN मजकूर). ५ मे २०१८ रोजी पाहिले.