चर्चा:शिंटोवाद
चीन की जपान
संपादन@AShiv1212: कन्फ्यूशियन, ताओ आणि बौद्ध धर्म हे चीन मधील सर्वात प्रचलित/मोठे धर्म प्रचलित आहेत, जपान मधील नव्हे. कृपया ही लेखातील पहिली ओळ पहावी, व दुरुस्त करावी.
आधीच शिंतो धर्म हे पान अस्तित्वात असल्याने या पानावरील आवश्यक तो शिंतो धर्म पानावर हलवावा. धन्यवाद--संदेश हिवाळेचर्चा २१:१८, ३ नोव्हेंबर २०२२ (IST)
- नमस्कार सर , तुम्ही संदर्भ सर्व चेक केलेलं आहे का? AShiv1212 (चर्चा) २२:२५, ३ नोव्हेंबर २०२२ (IST)
- बौद्ध धर्म, ताओ धर्म आणि कन्फ्युशियनवाद हे चीनमधील तीन सर्वात मोठे धर्म/विचारप्रवाह आहेत. तर बौद्ध धर्म आणि शिंतो धर्म हे जपानमधील दोन सर्वात मोठे धर्म आहेत (हे पहावे). मात्र शिंतो धर्माचे थोडे अनुयायी चीनमध्येही आढळतात आणि कन्फ्युशियनवादाचे थोडे अनुयायी जपानमध्येही आढळतात. पण वस्तुस्थिती ही की, शिंतोवाद जपानमध्ये प्रबळ आहे आणि कन्फ्युशियनवाद चीनमध्ये प्रबळ आहे, जपानमध्ये नाही. कृपया, कन्फ्युशियनवाद हा जपानमधील मोठा किंवा प्रमुख धर्म असल्याचा पुरावा सादर करा.
- --संदेश हिवाळेचर्चा १५:४२, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)
@Sandesh9822: सर मराठी विकिपीडियावर मी जे संदर्भ जोडलेला आहेत. त्या त्याबाबतीत मी तुमच्याशी येते चर्चा करत आहे. तुम्ही मला इंग्रजी विकिपीडियाच्या बाबतीत येते उदाहरण नका देऊ. मी इंग्रजी विकिपीडियावर चर्चासत्र सुरू करू शकतो तुम्ही तिथे येण्यासाठी तुम्हाला खूप समस्या आहेत. त्याच्यामुळे मी येथेच चर्चा सुरू ठेवत आहे. AShiv1212 (चर्चा) १६:०८, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)
@Sandesh9822: प्रमुख आणि मोठा धर्म असा मी उल्लेख कोठे केलेला आहे? प्रचलित शब्दाचा नक्की अर्थ काय होतो?[१][२] कन्फ्युशियनवाद याचा पुरावा मी जोडलेला आहे तुम्ही ते तपासून पहा.. {इंग्रजी विकिपीडियावर तुम्हाला ओपन गॅलरी एक्सेस उपलब्ध असेल तर तिथे तुम्हाला हा पुस्तक वाचता येऊ शकेल कदाचित असेल तर} .
तुम्ही इंग्रजी विकिपीडिया चा संदर्भ दिलेलं तर तिथे जोडलेलं संदर्भ हे लोकसंख्या चा रिपोर्ट आहे धर्मावर आधारित केलेला रिपोर्ट नाही [३] AShiv1212 (चर्चा) १८:४०, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)
- गैरसमज निर्माण करुन घेऊ नये. हा संदर्भ तुम्ही जोडलेला संदर्भ मी आधीच पाहिला आहे. या संदर्भामध्ये "कन्फ्युशियनवाद हा जपानमधील एक मोठा किंवा प्रमुख धर्म असल्याचा उल्लेख" कोठे नमूद आहे, हे कृपया स्पष्ट करावे. सदर मुद्द्याची अजून शहानिशा करण्यासाठी तुम्ही इंग्रजी विकिपीडियावर देखील चर्चासत्र सुरू करू शकता, जेथे संबंधित विषयातील जाणकार लोक नक्कीच तुमचे समाधान करतील. इंग्लिश विकिपीडियावर जपानमधील धर्मांची लोकसंख्या दिलेली आहे, म्हणून मी ती लिंक दिली होती. कन्फ्युशियनवाद, ताओवाद, इस्लाम, ख्रिश्चन धर्म हे जपानमधील "लहान" धर्म आहेत.
- कृपया, ह्या पानावरील मजकूर शिंतो धर्म पानावर हलवावा.
- @अभय नातू, संतोष गोरे, आणि Usernamekiran: कृपया आपले मत मांडावे. --संदेश हिवाळेचर्चा १८:५८, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)
@AShiv1212: "जपानमध्ये तीन प्रचलित धर्म आहेत", असा उल्लेख तुम्ही केला आहे, ज्याचा सरळ अर्थ जपानमध्ये "हे तीन प्रमुख धर्म आहेत" असा होता. कृपया, "जपानमधील प्रचलित धर्म" आणि "जपानमधील धर्म" या दोघांमधील फरक स्पष्ट करावा. आपण जपानमध्ये असलेले इस्लाम, ख्रिश्चन धर्म, आणि हिंदू धर्म यांना "जपानमधील प्रचलित धर्म" म्हणावे का? तेव्हा 3 ऐवजी तिहेरी अंक होईल. जर "जपानमधील प्रचलित धर्म" याचा अर्थ "जपानमधील धर्म" असा घेतला तर जपानमध्ये केवळ तीनच धर्म आहेत, असा अर्थ त्यातून निघेल. --संदेश हिवाळेचर्चा १९:११, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)
एक मोठा किंवा प्रमुख धर्म या शब्दाचा उल्लेख मी पानांमध्ये कोठे केलेला आहे ते मला दाखवा. प्रचलित शब्दाचा अर्थ प्रमुख धर्म असा कोठे लिहिलेलं आहे.
@अभय नातू: ,@संतोष गोरे: ,@Usernamekiran: सर हे तुम्ही तपासून पहा... हे प्रचालक स्वतःचे शब्द मिक्स करून त्याचे पुरावे माझ्याकडे मागत आहेत. मला या प्रचालक बरोबर कोणतेही वाद करायचे नाहीयेत तुम्ही हे पान हटवलं तरी चालेल. AShiv1212 (चर्चा) १९:१९, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @AShiv1212:, @Sandesh9822:,
- येथे उलटसुलट बरीच चर्चा झाली आहे परंतु त्यात संदर्भ दिलेले दिसत नाही तसेच नेमके कोणाला काय म्हणायचे आहे हे कळत नाही. कृपया --
- १. Sandesh9822 -- AShiv1212 यांच्या नेमक्या कोणत्या विधानाबद्दल आक्षेप आहे हे येथे उद्धृत करा व त्याला कारण काय आहे हे कळवा. त्याचबरोबर तुमच्या मताबद्दल संदर्भ द्.ा
- २. AShiv1212 -- या विधानाच्या सत्यतेबद्दल संदर्भ द्यावे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०८:५२, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @अभय नातू: "जपानमध्ये तीन धर्म प्रचलित आहेत — कन्फ्यूशियन, ताओ आणि बौद्ध धर्म." असे लेखामध्ये पहिले वाक्य आहे, ज्यावर माझा आक्षेप आहे. बौद्ध धर्म, ताओ धर्म आणि कन्फ्युशियन धर्म हे चीनमधील प्रचलित धर्म आहेत, जपानमधील नाही. जपानमधील प्रचलित धर्म बौद्ध आणि शिंतो धर्म आहे (कन्फ्यूशियन आणि ताओ धर्म नव्हे). सदर सदस्यास "चीनमधील धर्म" आणि "जपानमधील धर्म" यांमध्ये कन्फ्युजन झालेले असावे.
- जपानमधील ३ प्रचलित धर्मांचा अर्थ प्रमुख धर्म असा घेतला तर ३ ऐवजी "जपानमध्ये २ प्रचलित धर्म आहेत" (शिंतो आणि बौद्ध) असे म्हणावे लागेल.
- जर जपानमधील प्रचलित धर्मांचा अर्थ आपण जपानमध्ये अस्तित्वात असलेले धर्म असा अर्थ घेतला तर तीन ऐवजी "जपानमध्ये सुमारे १,८१,००० धर्म प्रचलित आहेत" असे म्हणावे लागेल.
- जपानी सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार (संदर्भ - पान नं. 2),
- The number of religious groups in Japan: 181 thousand
- Shinto followers: 89.5 million (70.4% of the total population)
- Buddhists: 88.7 million (69.8%)
- Christians: 1.9 million (1.5%)
- Other religions: 8.9 million (6.9%).
- वरील शासकीय आकडेवारीनुसार दोन धर्म प्रमुख दिसत आहेत शिंतो आणि बौद्ध. जपानच्या कोणत्याही धार्मिक आकडेवारी मध्ये तुम्हाला हे दोनच धर्म प्रमुख दिसतील. तेथे कन्फ्युशियन धर्म प्रमुख धर्म म्हणून आढळणार नाही.
- जपानी लोक "एकत्रितपणे" शिंतो आणि बौद्ध धर्माचे अनुसरून करतात त्यामुळे जपानची धार्मिक आकडेवारी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक जाते. वरील आकडेवारीमध्ये तेव्हा जपानच्या अन्य धार्मिक आकडेवारींमध्ये कन्फ्युशियनवाद या चिनी धर्माचा उल्लेख आढळत नाही. ख्रिश्चन, हिंदू, इस्लाम यांसारखे जपानमधील जे लहान लहान धर्म आहेत, त्यांपैकीच कन्फ्युशियनवाद हा सुद्धा एक लहान धर्म आहे, त्यामुळे त्याला जपानच्या "तीन" प्रचलित/प्रमुख धर्मांपैकी एक संबोधणे चुकीचे आहे.
- --संदेश हिवाळेचर्चा ०९:३६, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)
प्रथम = प्रचलित शब्दाचा अर्थ रुढी किंवा रीतीनुसार असा होतो ( [४] [५] शब्दाच्या अर्थासाठी डिक्शनरी चा संदर्भ लिंक हवी असेल ते सुद्धा मी देऊ शकेन.)
तर माझा प्रश्न असा आहे. तर प्रचलित शब्दाचा अर्थ कोणत्या शब्दकोशामध्ये एक मोठा किंवा मोठा धर्म असा लिहिलेला आहे त्याचा मला संदर्भ मिळावे. AShiv1212 (चर्चा) १०:३८, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)
मी पानांमध्ये ज्या शब्दाचा वापर केलेला आहे त्याच पद्धतीने संदर्भ जोडलेला आहे.
पुस्तकाचं नाव : The Worship of Confucius in Japan पुस्तकाची लिंक :[६] पुस्तकामधील संदर्भाचे मुख्य नाव : Introduction पुस्तकातील पानाचा नंबर : १ पुस्तकामध्ये लिहिले गेलेले शब्द : "Confucius has been worshipped in Japan for more than thirteen cen-turies. Yet of the three traditions, Shinto, Buddhism, and Confucianism, which make up the religious and philosophical heritage of modern Japan, Confucianism has left the fewest visible reminders of its past. Visitors to Japan see ubiquitous Buddhist temples and Shinto shrines, but few of the more than fifty Confucian shrines built before the Restoration survive." AShiv1212 (चर्चा) १०:३९, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)
- Yet of the three traditions, Shinto, Buddhism, and Confucianism, which make up the religious and philosophical heritage of modern Japan.
- येथे शिंतो धर्म, बौद्ध धर्म आणि कन्फ्युशियनवाद यांचा उल्लेख आहे. मात्र तुम्ही लेखात ताओ धर्म, बौद्ध धर्म आणि कन्फ्युशियनवाद असा उल्लेख केलेला आहे. जपानच्या three traditions मध्ये (तीन प्रचलित धर्मांमध्ये) तुम्ही, शिंतो काढून तेथे ताओ लिहिला, याबद्दल काय सांगाल? प्रचलित शब्दाचा अर्थ रुढी किंवा रीतीनुसार असा घेतला तरी शिंटो धर्माऐवजी ताओधर्म लिहिले जाऊ शकत नाही. येथे दोन किंवा तीन नव्हे तर चार धर्मांचा उल्लेख होतोय. --संदेश हिवाळेचर्चा ११:०२, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)
त्या ठिकाणी मी जे संदर्भ जोडलेला आहे ते तुम्हाला पाहता येत नसेल तर मी दुसरा संदर्भ पण देईन. पण तुम्ही माझ्या वरच्या प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही.
- @अभय नातू: सर वर जो मुद्दा उपस्थित केलेला होता त्याचा संदर्भ मी दिलेला आहे. त्यांनी दुसरा मुद्दा उचललेला आहे. पण माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलेलं अजून सुद्धा नाही. आशा करतो की ते माझ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतील मग मी त्यांचा दुसऱ्या मुद्द्याचा संदर्भ सुद्धा देईल. AShiv1212 (चर्चा) ११:२९, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @अभय नातू: सर वरती प्रचालकाचा काहीतरी गोंधळ झालेला आहे हे तपासून पहा. त्यांनी वर काही असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. शिंतो काढून तेथे ताओ लिहिला
सर्वात प्रथम मी येथे स्पष्ट करू इच्छितो की मी सुरुवातीपासून पान तयार करताना त्याच्यामध्ये शब्दाचा कोणताही बदल केलेला नाही.AShiv1212 (चर्चा) १४:००, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @Ashiv1212 आणि Sandesh9822:
- मला वाटते येथील गोंधळ प्रामुख्याने पहिल्या काही वाक्यांतील धर्म/पंथ यांच्या उल्लेखातून होत आहे.
- जपान मध्ये तीन धर्म प्रचलित आहेत, कन्फ्यूशियन,[१][२][३] ताओ [४]आणि बौद्ध धर्म, त्यापैकी बौद्ध धर्म हा सर्वात प्रभावशाली आहे. जपानमधील हे सर्व धर्म चीनमधून आले. [५] येथील मूळ स्थानिक लोक आयन आहेत. म्हणून, शिंटो हा प्रामुख्याने स्थानिक धर्म आहे
- शिंटोवाद या लेखाच्या प्रस्तावनेच्या वाक्यात इतर तीन धर्म/पंथ (कन्फ्यूशियन, ताओ आणि बौद्ध) यांचा उल्लेख आहे परंतु शितो धर्म/पंथाचा नाही. यांतील शेवटच्या वाक्याचा अर्थ मी शिंतो धर्म हा स्थानिक आहे (आणि इतर तीन चीनमधून आले) असा लावला. या वाक्यातून शिंतो धर्म जपानमधील प्रमुख धर्म आहे असा अर्थ निघत नाही. मला वाटते Sandesh9822 यांनी येथे वेगळा अर्थ काढून शिंतो धर्म जपानमधील मुख्य धर्मांपैकी एक आहे असा लावला आहे.
- Sandhesh9822 -- वरील चर्चा व लेखाच्या प्रस्तावनेचे माझे विवरण बरोबर आहे का, हे कळवावे. हे बरोबर असल्यास तुमचे शंकानिरसन झाले असावे असा कयास आहे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०२:४८, ७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- :@अभय नातू: धन्यवाद सर. काही शंकानिरसन झाले, केवळ एक मुद्दा बाकी राहिला.
- शिंतो धर्म हा स्थानिक आहे" या वाक्यातून शिंतो धर्म जपानमधील प्रमुख धर्म आहे असा अर्थ निघत नाही.
- आपण लिहिलेल्या वरील वाक्यातून लेखामध्ये "शिंतो धर्म हा स्थानिक असून तो जपानमधील प्रमुख धर्म नाही असाच अर्थ निघतो का?
जर असा अर्थ लेखातून प्रकट होत असेल तर ते चुकीचे आहे, आणि त्यात खालीलप्रमाणे सुधारणा आवश्यक आहेत.
- वस्तुस्थिती ही आहे की, बौद्ध धर्माच्या जोडीने शिंतो धर्म हा जपानमधील सर्वात मोठा धर्म (the largest religion) आहे. कारण अधिकृत आकडेवारीनुसार, ::जपानमधील 70.4% लोकसंख्या शिंटो धर्माची अनुयायी आहे तर 69.8% लोकसंख्या बौद्ध धर्माची अनुयायी आहे. (वर संदर्भ मिळेल) बौद्ध व शिंटो यांची 140% दिसते, कारण जपानमधील बहुसंख्य लोक एकत्रितपणे या दोन्हीचे अनुयायी आहेत. थोडक्यात, [जवळपास सारखीच लोकसंख्या असणारे] शिंतो धर्म आणि बौद्ध धर्म हे जपानमधील २ सर्वात मोठे धर्म आहेत. सदर आशय लेखातून प्रकट व्हावा, ही विनंती.
- [पहिली ओळ] प्रचलित धर्मांमध्ये कोणत्याही धर्माचे नाव असले तरी त्यावर माझी नाहरकत आहे. प्रचलित धर्मांमध्ये लिहिले गेलेले कन्फ्युशियनवाद व ताओ धर्म हे जपानमध्ये लोकसंख्येने दृष्टीने फार लहान धर्म आहेत (याउलट चीन). --संदेश हिवाळेचर्चा ०४:०७, ७ नोव्हेंबर २०२२ (IST)
@अभय नातू: सर वर प्रचालकांनी संदर्भ दिलेला हा 2017 चा आहे आणि इंग्लिश विकिपीडियावर [७] 2018 च्या रिपोर्टचा उल्लेख सुद्धा आहे त्याच्यामध्ये 62% No religion म्हणून [८].
आता प्रचालकांना जो शब्द जोडायचा आहे त्याचा संदर्भ घ्यावा लागणार. फक्त प्रचालकाला हे वाटतं ते वाटतं... महत्त्वाचं म्हणजे प्रचालकांना जसं हवं तसं काही करता येणार नाही प्रचालकाने संदर्भ द्यावं त्या पद्धतीने ते सर्व बदल करा. विकिपीडियाचा नियम आहे संदर्भ हा द्यावा लागणारच. AShiv1212 (चर्चा) ०७:४९, ७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @AShiv1212: Religion in Japan या इंग्रजी विपी लेखावर जोडलेल्या एका संदर्भाचा दाखला तुम्ही वर दिला आहे, याच इंग्रजी लेखातील सुरुवातीच्याच काही ओळी मी खाली देत आहे.
- Religion in Japan is manifested primarily in Shinto and in Buddhism, the two main faiths, which Japanese people often practice simultaneously. According to estimates, as many as 80% of the populace follow Shinto rituals to some degree, worshiping ancestors and spirits at domestic altars and public shrines. An almost equally high number is reported as Buddhist.
- en:Shinto --> demographic ---> Official statistics show Shinto to be Japan's largest religion, with over 80 percent of the country's population identified as engaging in Shinto activities.[१][२] Conversely, in questionnaires only a small minority of Japanese describe themselves as "Shintoists."[१] This indicates that a far larger number of people engage in Shinto activities than cite Shinto as their religious identity.[१] There are no formal rituals to become a practitioner of "folk Shinto". Thus, "Shinto membership" is often estimated counting only those who do join organised Shinto sects. [३] Shinto has about 81,000 shrines and about 85,000 priests in the country.[२] According to surveys carried out in 2006[४] and 2008,[५] less than 40% of the population of Japan identifies with an organised religion: around 35% are Buddhists, 30% to 40% are members of Shinto sects and derived religions.
- यावरून जपानमधील धार्मिक प्रवृत्ती सहज लक्षात येईल. @अभय नातू: कृपया बघावे. वरील बदल करणे या लेखात आवश्यक तर आहेतच, शिवाय हा लेख शिंटो धर्म लेखात हलवणे सुद्धा आहे. --संदेश हिवाळेचर्चा ०८:५७, ७ नोव्हेंबर २०२२ (IST)
@अभय नातू: सर संदर्भ कोणताही दिलेला नाही इंग्रजी विकिपीडिया वरचा लोकसंख्येचा रिपोर्टवरचं हे माहिती सांगत आहेत. महत्त्वाचं म्हणजे हा रिपोर्ट जाती/धर्म अंतर्गत नाही. [९]
अभय सर हे प्रचालक मुद्देसूद संदर्भसहित माहिती देत नाहीत.AShiv1212 (चर्चा) ०९:१४, ७ नोव्हेंबर २०२२ (IST)
@अभय नातू: सर The Washington Post चा एक रिपोर्ट आहे 62% " Percentage of respondents in each country claiming to be either not religious or atheist" [१०] AShiv1212 (चर्चा) ११:३३, ७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- एका नव्हे तर अनेक सर्वेक्षणांमध्ये शिंटो [आणि बौद्ध] देशाचा सर्वात मोठा धर्म आहे. वर मी अनेक संदर्भ जोडले आहेत, तसेच ते कोणत्या इंग्लिश विकि पृष्ठावर आहेत, तेही नमूद केले आहे. --संदेश हिवाळेचर्चा ११:५८, ७ नोव्हेंबर २०२२ (IST)
हे प्रचालक सर्व संदर्भ कॉपी करून येथे पेस्ट केलेले आहेत.
- 1 संदर्भ - प्रथम तुम्ही पुस्तकाचे नाव चुकीचे सांगितलं खरं पुस्तकाचं नाव हे (A New History of Shinto) आहे लिंक सुद्धा देतो पहा [११] आणि पान वाचून तुम्ही त्यातलं महत्त्वाचा मुद्दा मला सांगा. माझ्या माहितीनुसार त्या पानावर मंदिराची माहिती सांगत आहे.
- 2 संदर्भ - मृत्
- 3 संदर्भ - पुस्तकाचं नाव चुकीचं आहे हे माहिती पुस्तकाच्या कितव्या पानावर आहे. ( पुस्तकाचं नाव हे आहे - Shinto (Religions of the World): Williams, George, Bhar, Ann Marie B., Marty, Martin E )
- 4 संदर्भ - तुम्ही जोडलेल्या संदर्भामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे (जपानच्या वैशिष्ट्यांबद्दल, सर्व प्रथम, हे लक्षात येते की 63.0% प्रतिसादकर्ते गैर-धार्मिक आहेत, जे 60% पेक्षा जास्त आहेत. जगभरात, समाजवादी देशांमध्ये आणि पूर्वीच्या समाजवादी देशांमध्ये )
- 5 संदर्भ - तुम्ही जोडलेल्या संदर्भामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे शिंटो धर्माचे तीन टक्के म्हणून ( बौद्ध धर्म 34%, शिंटो 3%, ख्रिश्चन धर्म 1% आणि इतर धर्म 1% वर पाळतात. दुसरीकडे, 49% प्रतिसादकर्त्यांनी उत्तर दिले की ते एका धर्मावर विश्वास ठेवत नाहीत, जो धर्म मानणाऱ्यांपेक्षा जास्त )
- 6 संदर्भ - AShiv1212 (चर्चा) १३:१२, ७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- ^ a b c Breen & Teeuwen 2010, पान. 1.
- ^ a b "宗教団体数,教師数及び信者数". Statistical Yearbook of Japan. Statistics Japan, Ministry of Internal Affairs and Communications. 2015. August 25, 2015 रोजी पाहिले.
- ^ Williams, Bhar & Marty 2004, पाने. 4–5.
- ^ Dentsu Communication Institute, Japan Research Center: Sixty Countries' Values Databook (世界60カ国価値観データブック).
- ^ "2008 NHK survey of religion in Japan — 宗教的なもの にひかれる日本人〜ISSP国際比較調査(宗教)から〜" (PDF). NHK Culture Research Institute.
- ^ McQuaid, John. "A View of Religion in Japan". Japan Society. January 23, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 29, 2017 रोजी पाहिले.