शिंतो धर्म

(शिंटो धर्म या पानावरून पुनर्निर्देशित)

शिंतो किंवा शिंटो (जपानी: 神道) हा जपान मधील सर्वात मोठा धर्म आहे. या धर्मास जपानी लोकांचा स्थानिक व आध्यात्मिक धर्म मानले जाते. अनेक अहवालांनुसार, जपानमधील सुमारे ७०% ते ९६% लोक शिंतो धर्माला मानणारी आहे.[][][] जपानमध्ये सुमारे ८०,००० शिंतो विहारे (स्तूप) अस्तित्त्वात आहेत. जपानी लोक शिंतो धर्माचे आणि बौद्ध धर्माचे एकत्रितपणे पालन करतात.

शिंतो धर्माचे चिन्ह
फुशिमा इतरी येथील शिंतो स्तूप

जपानमध्ये चीनमधून आलेले तीन धर्म प्रचलित आहेत : कन्फ्यूशियन,[][][] ताओ []आणि बौद्ध धर्म, त्यापैकी बौद्ध धर्म हा सर्वात प्रभावशाली आहे.[] जपानमधील मूळ स्थानिक लोक आयन आहेत, आणि शिंटो हा प्रामुख्याने येथील स्थानिक धर्म आहे.[] इतर दोन वंश आशियाई प्रदेशातील आहेत. या वांशिक तंतूंनी जपानची संस्कृती, भाषा आणि पौराणिक कथांवर आपली छाप सोडली आहे. या परदेशी घटकांनी शिंटो धर्माच्या द्वैतवादालाही अंतिम स्वरूप दिले. शिंटोवादच्या संपूर्ण इतिहासात हा द्वैतवाद दिसून येतो. हा द्वैतवाद औपचारिक, अधिकृत आणि राष्ट्रीय संप्रदाय, लोकप्रिय प्रथा आणि सामान्य दैनंदिन जीवनामध्ये आढळतो.[१०]

उत्पत्ती

संपादन

शिंटोवादची नेमकी उत्पत्ती अज्ञात आहे. जपानच्या पारंपारिक कालगणनेनुसार शिंटोवादचा उगम इ.स ६६० मध्ये झाला आहे. हा पहिला जपानी सम्राट (सिकडी) जिमू टेन्नोचा काळ आहे. शिंटोवाद हा तिसरा जुना धर्म आहे. राजकीय सिद्धांत आणि राष्ट्रीय स्थिर योगदानामुळे जगातील विविध धर्मांमध्ये हे एक विशेष स्थान व्यापलेले आहे. शिंटोवादचे वैशिष्ठ्य म्हणजे ते जपानमध्ये पूर्ण वर्चस्वाचे स्थान व्यापते. जपानमधील शिंटो धर्माचा हा निर्विवाद प्रभाव इ.स ८६८ मध्ये जपानमध्ये बौद्ध धर्माचा पदार्पण होईपर्यंत टिकला.[११]

ग्रंथ

संपादन

को-जी-की प्राचीन घडामोडींचे दस्तऐवज (Kojiki or 'Records of Ancient Matters' (712 CE) )[१२] आणि निहोन गी (निहोन शोकी) जपानचे इतिहास ( Nihon-gi or 'Chronicles of Japan' (720 CE). )[१३]या साहित्याच्या दोन प्रमुख समुहाना शिंटोवादचे पवित्र ग्रंथ म्हणले जाते. हा जपानच्या स्थानिक साहित्याचा सर्वात आदरणीय, मौल्यवान आणि प्रभावशाली दस्तऐवज आहे. हे कामीची कथा आणि मानवाच्या अस्तित्त्वापूर्वीच्या दैवी युगातील संवाद सांगतात. या ग्रंथांची सुरुवात सूर्योदयाच्या बेटांच्या निर्मितीच्या कथेपासून होते. हे ग्रंथ देखील मनोरंजकपणे सांगतात की राजेशाही वंश थेट स्वर्गातून जपानच्या बेटांवर कसा आला.[१४]

शिंटो हा मुळात निसर्गपूजेचा धर्म आहे. या प्रकारची उपासना शिंटो पंथांमध्ये, सणांमध्ये आणि विधींमध्ये अगदी स्पष्टपणे दिसून येते. परिणामी, शिंटो निसर्गाच्या देवत्वावर दृढ विश्वास दाखवतात. हे जपानी भाषेतील सर्वात लोकप्रिय शब्द कामी म्हणून ओळखले जातात. कामी चा शाब्दिक अर्थ उच्च आहे. इतर धर्मांमध्ये या शब्दाचा विविध प्रकारे अर्थ लावला गेला आहे. याचा अर्थ शुद्ध किंवा चमकदार श्रेष्ठ, रहस्यमय, गुप्त आणि अलौकिक असा होतो. त्याचा सामान्यतः वापरला जाणारा अर्थ श्रेष्ठ अस्तित्त्व आहे. ते दोन्ही देवी-देवता आहेत. हे विशिष्ट आणि वैयक्तिक दोन्ही आहे.[१५] जपानमध्ये प्रकाशित झालेल्या शिंटोवरील नवीनतम सर्वसमावेशक ग्रंथात कामी शब्दाच्या उत्पत्ती आणि महत्त्वासंबंधी सोळा भिन्न सिद्धांत आहेत. हे तीन मुख्य विचारांनुसार वर्गीकृत केले आहे. शुद्ध आणि चमकदार श्रेष्ठ, अनोळखी रहस्यमय, भितीदायक जादू आणि अलौकिक मूळ जपानी भाषेत इतका समृद्ध आणि बहुरूपी थीम असलेला दुसरा शब्द नाही. शिंटोच्या संपूर्ण इतिहासातील सर्वात प्रसिद्ध धर्मशास्त्रज्ञ म्हणजे मोतुरी (१७३०-१८०१), ज्याने कामी शब्दाचा खरा अर्थ शोधण्यासाठी अथक परिश्रम घेतले.[१६]

संदर्भ

संपादन
  1. ^ McQuaid, John. "A View of Religion in Japan". Japan Society. January 23, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 29, 2017 रोजी पाहिले.
  2. ^ Breen & Teeuwen 2010, पान. 1.
  3. ^ "宗教団体数,教師数及び信者数". Statistical Yearbook of Japan. Statistics Japan, Ministry of Internal Affairs and Communications. 2015. August 25, 2015 रोजी पाहिले.
  4. ^ McMullen, James (2016). The Worship of Confucius in Japan. Harvard University Asia Center. pp. 1–22. ISBN 978-11-070-5865-1. 3 November 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "Japanese religion" (PDF). The Stanford Program on International and Cross-Cultural Education (SPICE) (English भाषेत). 4 November 2022. 3 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 3 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ Paramore, Kiri (2016). Japanese Confucianism : A Cultural History. Harvard University Press. p. 249. ISBN 978-11-074-1593-5. 3 November 2022 रोजी पाहिले.
  7. ^ Mark, John (2001). Shinto and Taoism in early Japan. Routledge. p. 19. ISBN 978-13-150-2789-0. 3 November 2022 रोजी पाहिले.
  8. ^ "History of China and Japan 1840-1949" (PDF). eiiluniversity.co.in (English भाषेत). 3 November 2022. 3 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 3 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "Shinto in the History of Japanese Religion" (PDF). Japan.univie.ac.at (English भाषेत). 3 November 2022. 3 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 3 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "Shintoism" (PDF). Eric.ed.gov (English भाषेत). 3 November 2022. 3 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 3 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ "Religion in Japan : Shintoism, Buddhism, Christianity" (PDF). Wayback Machine (English भाषेत). 3 November 2022. 3 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 3 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  12. ^ "Record of Ancient Matters" (PDF). Japan.univie.ac.at (English भाषेत). 3 November 2022. 3 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 3 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  13. ^ "Chronicle of Japan, Volumes 1 and 2" (PDF). tile.loc.gov (Japanese भाषेत). 3 November 2022. 3 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 3 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  14. ^ "Shinto holy books". bbc.co.uk (English भाषेत). 21 September 2009. 3 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  15. ^ "Kami-no-michi: the way of the gods in Japan" (PDF). Wayback Machine (English भाषेत). 3 November 2022. 3 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 3 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  16. ^ Shigeru, Matsumoto (1993). Motoori Norinaga: 1730-1801. Harvard University Press. pp. 84–86. ISBN 978-06-081-0090-6. 3 November 2022 रोजी पाहिले.

बाय दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत