चर्चा:रेशीम मार्गाद्वारे बौद्ध धर्माचा प्रसार

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by आर्या जोशी

@प्रसाद साळवे आणि अभय नातू: नमस्कार ! सिल्क रूट किंवा रेशीम मार्ग याचे भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे.संस्कृतीची देवाणघेवाण,व्यापार या गोष्टीही या मार्गाच्या माध्यमातून झाल्या आहेत.त्यामुळे रेशीम मार्ग एवढेच या लेखाचे नाव करावे आणि त्यातील एक परिच्छेद हा बौद्ध धर्म प्रसार याद्वारे कसा झाला असा असावा असे वाटते.धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) १५:४३, २१ मे २०१८ (IST)Reply

@आर्या जोशी: रेशीम मार्ग असा स्वतंत्र लेख मराठी विकीवर उपलब्ध आहे आपण खात्री करावी. व त्यात भर घालावी प्रसाद साळवे (चर्चा) १५:५१, २१ मे २०१८ (IST)Reply
हा लेख रेशीम मार्ग किंवा बौद्ध धर्म यांच्यात विलीन करावा.
अभय नातू (चर्चा) १८:२७, २१ मे २०१८ (IST)Reply


सदर लेख हा विस्तारत असल्याने घाईत सूचवू नये अथवा निर्णय देऊ नये ही विनंती.

या लेखाला स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे या लेखाचे विलीनीकरण करू नये. वर सुचविलेल्या लेखात या लेखाचा सारांशरूपी भाग समाविष्ट करता येईल. प्रसाद साळवे (चर्चा) २०:४०, २१ मे २०१८ (IST)Reply

लेखाला स्वतंत्र अस्तित्त्व म्हणजे काय? लेख तयार केला की अस्तित्त्व होतेच.
लेखाला स्वतंत्र महत्व किंवा उल्लेखनीयता आहे का? असेल तर कसे ते लिहावे.
फक्त बौद्ध धर्म नव्हे तर विश्वकोशीय लेखनाच्या दृष्टीने विचार करावा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:४८, २१ मे २०१८ (IST)Reply


मान्य आहे आंतरविकी दुवे जोडून देखील ते इंग्रजीत असले म्हणून मराठीत असलेच पाहिजे असे नव्हे असे आपले मत असेल. व तुम्ही म्हणाल तोच महत्वाचा आणि तोच उल्लेखनीय असणे मान्य करावेच लागेलच अर्थात त्याला पर्याय आम्ही कितीही सांगितले तरी नसणारच. अर्थात सांगाल ती पूर्व दिशा असणारच ही सवयच करून घेतो आहोत.

@आर्या जोशी: रेशीम मार्ग लेख उपलब्ध असताना तुमच्या दृष्टिपथास तो आला का नाही ? की आजूनही तीच मागणी आहे. कारण तुम्ही वयाने जेष्ठ आहात व श्रीमान नातू तुम्ही साद दिली कि तुमच्या बाजूनेच प्रतिसाद देतात. हे नित्याचेच म्हणून रेशीम मार्ग स्वतंत्र लेख असल्याबाबत तुमचे समाधान झाले आहे काय ? कि आम्हा अज्ञानी पामराला त्याचे विलयन करावे लागेल. अभय नातूच्या प्रतिसादा नंतरही तुमची प्रतिक्रिया आली नाही म्हणून साद दिला आहे.

श्रीमती आर्या जोशीजी इंग्रजी विकिपीडियावर दोन्ही भिन्न लेख आहेत. व स्वतंत्र आहेतच. फक्त मराठीत तसे चालत नाही. हे मी नाईलाजाने मान्य केले आहे. पैकी एक लेख या लेखाशी संबंधित आहे तोच अनुवादीत करून मी हा लेख वाढवत आहे.

हा लेख रेशीम मार्गात विलयन करून रेशीम मार्ग द्वारा बौद्ध धर्म हा भागच जास्त झाल्यावर पुन्हा हरकत नसावी. कारण सदर लेख हा इंग्रजी विकिपीडियावर स्वतंत्र लेख आहे नी मी तो पूर्ण लेख अनुवादीत करणार आहे. पुन्हा रेशीम मार्ग लेखात त्याचा उपविभागच मोठा होईल. त्या महायान बौद्ध धर्म लेखाचाही भाग येणारच आहे.

ता.क. अतिशय महत्त्वाच्या बाबी बद्दलच व जेथे टोकाचा लेख विवाद उत्पन्न झाला तरच प्रचालकांना साद द्यावयाची असते असा संकेत असावा. व बारीक गोष्टीत देखील पडून प्रचालकांनी विवेकाने मध्ये पडायचे की नाही याचेही संकेत असावेत. (कदाचित् मराठी विकिपीडियावर मोजकेच प्रचालक व त्याहून active कमीच आहेत) असे असल्यामुळे होत असावे. बाकी उगाच कालापव्यय नको.. मराठी विकिपीडियावर प्रचंड अन्य कामे आहेत..

प्रसाद साळवे (चर्चा) २२:४९, २१ मे २०१८ (IST)Reply

मान्य आहे आंतरविकी दुवे जोडून देखील ते इंग्रजीत असले म्हणून मराठीत असलेच पाहिजे असे नव्हे असे आपले मत असेल. व तुम्ही म्हणाल तोच महत्वाचा आणि तोच उल्लेखनीय असणे मान्य करावेच लागेलच अर्थात त्याला पर्याय आम्ही कितीही सांगितले तरी नसणारच. अर्थात सांगाल ती पूर्व दिशा असणारच ही सवयच करून घेतो आहोत.
ही थेट व्यक्तिगत खोचक टिप्पणी केलीत म्हणून --
वेळोवेळी कारणे किंवा स्पष्टीकरण न देता नुसताच हेका धरुन ठेवला तर तसेच होईल हे लक्षात ठेवावे. येथे अनंत चर्चा झाल्या आहेत आणि अनेकांमध्ये चर्चा झाल्यावर इतरांचे मत मी उचलून धरलेले आहे. आपल्याला हवे तसे झाले नाही की कांगावा करणे हे येथे कोण करते आहे हे स्पष्ट आहेच.
येथील सगळे प्रचालक संपादक सुद्धा आहेत. त्यांना प्रश्न विचारण्याचा किंवा उत्तरे मागण्याचा इतरांइतकाच अधिकार आहे.
असो, मूळ मुद्द्याकडे परत लक्ष द्यावे आणि प्रचंड अन्य कामांना मार्गी लावावे ही विनंती.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २३:१३, २१ मे २०१८ (IST)Reply

@प्रसाद साळवे, अभय नातू, आणि सुबोध कुलकर्णी: नमस्कार! तुम्ही माझ्यावर व्यक्तीगत टिप्पणी केली आहे म्हणून हे नोंदवते आहे. अन्य संपादकांचे मला माहिती नाही पण मी जे सुचवत असते त्यासाठी दोन आधार माझ्यापाशी आहेत.

  1. भारतीय धर्म संस्कृती व इतिहास हे गेली अठरा वर्षे माझे संशोधनाचे विषय आहेत

  1. विकीच्या परिभाषेत सांगायचे तर मागील वर्षी बंगलोर येथे विकीमीडिया फाऊंडेशनने आयोजित प्रशिक्षणात मी निवडले गेले होतेआणि तिथे पाच पूर्ण दिवस माझे प्रशिक्षण झाले आहे.

गेली अनेक वर्षे इंग्रजी विकीवर संपादक असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा,त्यांच्याकडून शिकणे असे झाले आहे तसेच विकीडाटा संदर्भात असफ यांच्याकडे प्रशिक्षण घेताना या सर्व गोष्टी मांडण्याची आणि शिकण्याची संधी मला मिळाली आहे.

आता तुम्ही म्हणता तसे केवळ अट्टहासाने आपल्या आस्थेचे विषय मांडणार्‍या संपादकांपेक्षा ही माझी दोन वैशिष्ट्ये अहेत ज्यामुळे केवळ नातू सरच नव्हे तर सुबोध सरही मला सहकार्य करतात. आपण स्वतःला पुरेशा योग्य पद्धतीने सिद्ध केलं तर समजूतदार आणि अभ्यासू व्यक्ती आपल्या मताला निश्चितच मान देतात. तुम्ही बरेच जण माझ्या सूचना व्यक्तीगत टीका म्हणूनच पाहता हा मोठा दोष मला जाणवतो आहे.त्यामूळे माझ्यावर टीका करण्याआधी हे मूद्दे समजून घेतलेत तर माझ्याही मनात तुमच्या संपादनांबद्दल आदर वाढेल.प्रगल्भ प्रतिसादाच्या अपेक्षेत.आर्या जोशी (चर्चा) ११:२४, २२ मे २०१८ (IST)Reply

आदरणीय जोशी Madam आपण संशोधक व अभ्यासक आहात. तुमच्या विषयाचा तुम्हाला सखोल अभ्यास असून याचा आपल्या या विकिपीडियाला नेहमीच फायदा होत असतो.
मी स्वतः बद्दल सांगून स्वतःचा बडेजाव कधीही करत नाही. तसे करणेही मला योग्य वाटत नाही. तरीही प्रथमच सांगतो मला विकिपीडियावर सहा सात वर्षाचा संपादन अनुभव आहे. मी कोणताही लेख सुरू करतांना तो आधीच विकिपीडियावर आहे का हे आधी बघतो. मी विकिपीडियावर आधी लेख निर्मात्याला साद देवून शंका समाधान करून घेतो. प्रत्येक वेळी प्रचालकांना साद मध्ये न ओढणे मला प्रगल्भतेचे लक्षण वाटते.
शैक्षणिक दृष्टीने मला १५ वर्ष अध्यापनाचा अनुभव आहे. मी स्पर्धा परीक्षेत शिक्षक पात्रता चाचणीत महाराष्ट्रात दुसरा व नाशिक मध्ये पहिला आलो होतो. मी एम.ए.(समाजशास्र) व बी.एड. आहे. दोन वेळा mpsc च्या मुख्य परीक्षेस पात्र झालो होतो. पुढे मला नोकरी मिळल्यावर स्पर्धा परीक्षा कमी केल्या असून माझा वैयक्तिक ग्रंथसंग्रहही आहे. मी बौद्ध धर्म व आंबेडकरी साहित्याचा मागील २० वर्षापासून अभ्यासक आहे. (सन १९९८ पासून) मी अनेक ठिकाणी व्याख्यान ही दिले आहे. तरीही सर्वांनी माझे ऐकावे असे व मीच खरा असा कधीही मी दुराग्रह करत नाही.
मला माहित आहे शाहणपणा हा वयाने येत नाही. विचाराने येतो म्हणून मी अजूनही स्वतःला परिपूर्ण समजत नाही. कारण मी अजन्म विद्यार्थी आहे.
ता.क. रेशीम मार्ग (Silk Road), बौद्ध धर्म (Buddhism) व रेशीम मार्गाद्वारे बौद्ध धर्माचा प्रसार (Silk Road transmission of Buddhism) हे तिन्ही इंग्लिश व मराठी विकिपीडियावरील स्वतंत्र लेख आहेत. प्रसाद साळवे (चर्चा) १३:४१, २२ मे २०१८ (IST)Reply


@आर्या जोशी: माणूस प्रत्येकदा चुका करतो मग तो अनुभवी असो वा नसो. विकिपीडियावर अनेकदा चूक होते तुमच्यापासून व आमच्यापासून सुद्धा परंतु त्याचा उपाय चर्चेतून भेटते. या लेखात साळवे यांचे काम दिसत आहे व त्याला विस्तार ते पूर्णपणे करत आहे असे दिसते. हा लेख महत्वाचा वाटत आहे व त्याला विलीन न करता रेशीम मार्ग किंवा बौद्ध धर्म मध्ये सुद्धा याची नोंद असावी असे वाटते. सिल्क रूट किंवा रेशीम मार्ग या विषयी माहिती रेशीम मार्ग या लेखात जोडावे हा लेख फक्त बुद्ध धर्माविषयी असावे असे वाटते. सर्वांचा चर्चेसाठी धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला१३:०८, २२ मे २०१८ (IST)Reply

@प्रसाद साळवे, अभय नातू, आणि सुबोध कुलकर्णी: नमस्कार! प्रसाद सर तुमचा परिचय ऐकून छान वाटले.समकक्ष विचार करणारी माणसे एका व्यासपीठावर परस्पर पूरक होऊन काम करू शकतात असे वाटले होते.पण तसे चित्र दिसत नाही आहे मला तरी.तुम्ही लिहिले आहेत नं तसा मीही माझा बायोडेटा पाठवू शकेन सविस्तर. पण आपला अभ्यास ज्ञानकोश समृद्ध करण्यासाठी वापरायचा की बुद्धीची प्रगल्भता वाद करण्यात वाया घालवायची याचा सारासार विचार बुद्धीजीवी नक्कीच करू शकतात.मला सरळसरळ अनुभवाला येते आहे की जुळवून घेणे कठीण जात आहे. Assuming good faith हे तत्व सगळ्यांनीच स्वीकारायला हवं आहे.तुम्ही पाहिलं असेल तर सुरुवातीला मी सर्वच लेखांवर काम करीत असे.पण या अलीकडे येत असलेल्या अनुभवातून मी स्वतःच्याच लेखांवर काम करणे अधिक पसंत करते. तुम्हीही तुमच्या बुद्धीने आणि आकलनाने करत आहातच.तुम्हालाही शुभेच्छा!आर्या जोशी (चर्चा) ११:०८, २३ मे २०१८ (IST)Reply

"रेशीम मार्गाद्वारे बौद्ध धर्माचा प्रसार" पानाकडे परत चला.