चर्चा:भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

"संशोधन संस्था" ऐवजी "संशोधन मंदिर" हे नाव वापरण्याचे कारण काय असावे.?? कारण या बाबत पुनर्निर्देशन खूप वेळा झालेले आहे..प्रसाद साळवे (चर्चा)

हा लेख संपादताना मलाही हा प्रश्न पडला. कारण लेखात 'संस्था'असा उल्लेख आहे.म्हणून मी संस्थेचे अधिकृत संकेतस्थळपाहिले. ते इंग्रजीत आहे. 'The Bhandarkar Oriental Research Institute' चे भाषांतर मुखपृष्ठावर नाही. परंतु Announcements या सदराखाली असलेल्या निमंत्रण पत्रांवर 'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर'असाच उल्लेख आहे. जे वास्तव आहे ते नोंदवले जायला हवे.अधिक खात्री करून घेता येईल.
-सुबोध कुलकर्ण (चर्चा) ०८:२५, २ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

  • @सुबोध कुलकर्णी: @अभय नातू: मला वाटते 'The Bhandarkar Oriental Research Institute' या अधिकृत संकेतस्थळावरील INSTITUTE" शब्दाचे भाषांतर ""संस्था"" हे प्रमाण मानून शीर्षक कायमपणे पुनानिर्देशन करावे ????
प्रसाद साळवे (चर्चा) ०८:४२, २ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply


@: इंग्रजीत Institute आणि मराठीत मंदिर असा फरक का दिसतो ? @Salveramprasad: असा फरक का आहे ह्याची स्पष्ट माहिती अद्याप आंतरजालावर मिळत नाही, आंतरजालावर गेल्या १५ -२० वर्षांपर्यंतचेच उल्लेख सापडत आहेत त्यात मराठीत संस्थेच्या केवळ नावाचा उल्लेख करताना "भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर" असा आहे पण नंतरच्या वाक्यांमध्ये सहसा संस्थेचे संस्थेत संस्थेने असेच शब्द प्रयोग करावे लागताना दिसतात.
मराठी विश्वकोशातली नोंद 'भांडारकर_प्राच्यविद्या_संशोधन_मंदिर' अशी आहे. रसिक या पुस्तके विक्रीसंस्थळावर एका पुस्तकाचे कव्हर पहावयास मिळते त्यातही प्रकाशक म्हणून भांडारकर_प्राच्यविद्या_संशोधन_मंदिर अशी नोंद दिसते. अशा फरका बद्दल अधिक माहिती मिळे पर्यंत वाट पहाणे बरे असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:०४, २ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

दुसर्‍या एका संकेतस्थळावर (बहुधा उपक्रमवर) हीच चर्चा झाली होती त्यावेळी भांडारकरमध्ये काम करणार्‍या एका मुलीने अधिकृत मराठी नावात ‘मंदिर’ हाच शब्द आहे, असे खात्रीशीरपणे सांगितले होते, त्यामुळे इंग्रजीत Institute आणि मराठीत ‘मंदिर’ हेच बरोबर आहे. शिवाजी मंदिर इंग्रजीत Shivaji Temple किंवा शिवाजी चर्च होत नाही, तद्वतच Instituteचे मराठीत ‘संस्था’च होईल असे नाही.

Jesus Christ मराठीत जेसस क्राइस्ट न होता येशू ख्रिस्त, आणि हिंदीत ईसा मसीह होतो. King's Circleचे मराठीत ‘राजाचे वाटोळे’ करणारे महाभाग आहेत. ... (चर्चा) १६:४२, २ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

  • अधिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..
प्रसाद साळवे (चर्चा) १६:४९, २ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply
Institute साठी मन्दिर हे मलाही नवे आहे. अर्थात ऑनलाईन डिक्शनरींचा शोध घेतला तर मन्दिर शब्द देवालया शिवायसुद्धा बऱ्यापैकी वैविध्यपूर्ण पणे वापरला गेलेला दिसतो.
Kings Circle = राजाचे वाटोळे!!!
@:, सकाळी सकाळी हसविल्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २१:११, २ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply
"भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर" पानाकडे परत चला.