चर्चा:राज्यसभेच्या वर्तमान खासदारांची यादी

शीर्षक संपादन

नवीन शीर्षक हे योग्य वाटत नाही, त्याऐवजी "राज्यसभेच्या विद्यमान खासदारांची यादी" असं शीर्षक हवं. खासदार बदलत गेले तशी संपादने होत राहतील. कारण जुलैमधल्या जुलैमध्येच खासदार बदलणार आहेत. शिवाय हे पान en:List of current members of the Rajya Sabha या पानाचं थेट भाषांतर आहे. Mayur12025 (चर्चा) १३:०५, ९ जुलै २०१९ (IST)Reply

@: कृपया नोंद घ्यावी. इतर सर्व भाषांमध्ये या पानाचा मथळा हाच आहे. तेव्हा चर्चा पानावर चर्चा केल्यावरच असे बदल करावेत ही विनंती Mayur12025 (चर्चा) १३:१८, ९ जुलै २०१९ (IST)Reply

@: विद्यमान खासदार हा शब्द सर्व भाषांमध्ये वापरला गेलाय. राज्यसभा कधीच बरखास्त होत नसून त्यातील सदस्य हे वेळोवेळी निवडले जातात. तेव्हा लोकसभेप्रमाणे राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही. त्यामुळे या पानावर सदस्य बदलले तसे बदल करावे लागतील‌. तसंही हे पान इंग्रजी पानाचं थेट भाषांतर आहे आणि इंग्रजी, तमिळ, हिंदी, इ. विकींवर हेच शीर्षक आहे. Mayur12025 (चर्चा) ११:३६, १० जुलै २०१९ (IST)Reply

साचा:Ping:ज विद्यमान शब्द बदलून काळ दाखवणारा वर्तमान शब्द वापरलाय Mayur12025 (चर्चा) ११:४०, १० जुलै २०१९ (IST)Reply

@: विद्यमान शब्द बदलून काळ दाखवणारा वर्तमान शब्द वापरलाय Mayur12025 (चर्चा) ११:४१, १० जुलै २०१९ (IST)Reply

पानावर करावयाचे बदल संपादन

राज्यासभेत वारंवार खासदार निवृत्त होत असतात आणि नवीन खासदार पदभार स्वीकारत असतात. तेव्हा नवीन खासदाराची नियुक्ती झाल्यास या पानावर संदर्भासहित योग्य ते बदल करावेत ही विनंती Mayur12025 (चर्चा) १३:२५, ९ जुलै २०१९ (IST)Reply


विकीवरच्या पानावरील माहिती त्रिकालाबाधित असावी. त्या माहितीत आज, काल, उद्या, ५०० वर्षापूर्वी, १००० वर्षांंनंतर, आजकाल, नवीनच हे शब्द अजिबात असू नयेत. विकीवर लिहिलेली माहिती पुनःपुनः अद्यावत होईल याचा भरंवसा नाही. या ओळीत वरती दिलेल्या शब्दांऐवजी ९ जुलै २०१९, ८ जुलै २०१९, १० जुले २०१९, १६व्या शतकात, ३१व्या शतकात हे शब्द हवेत.

इतिहासाच्या पुस्तकात हल्ली, आजपासून ३०० वर्षांपूर्वी असे शब्द कुणी कधी वाचले आहेत?

इंग्रजीच्या आणि इतर सर्व भाषांतील विकिपीडियांवरील शीर्षके अयोग्य आहेत, त्यांना ती बदलायला सांगावीत. ... (चर्चा) २२:१७, ९ जुलै २०१९ (IST).Reply

@Mayur12025: मला वाटते 'विद्यमान' ला 'वर्तमान' हाही पर्याय योग्य नाही. @: त्रिकालाबाधित की कालातीत? ही चर्चा शीर्षकांच्या दृष्टीने महत्वाची आहे. विकी हा अद्ययावत असणे अपेक्षित आहे. पण याचा अर्थ शीर्षकात कालावधी टाकला तर लेख अद्ययावत झाला की शीर्षक बदलावे लागेल. यावर उपाय काय? @अभय नातू, आर्या जोशी, संदेश हिवाळे, आणि QueerEcofeminist: यांनीही आपली मते मांडावीत.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:४९, १० जुलै २०१९ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: @: ह्या पानावरील शीर्षक हे 'current members' म्हणजे 'वर्तमान सदस्य'च योग्य वाटते. कारण "जुलै २०१९ चे सदस्य' वगैरे लिहीणे स्पष्ट आयोग्य आहे. तसंही मजकुरात सदस्यांचा कार्यकाळ नमूद केलेला आहे, म्हणून एखाद्या वेळेस संपादन करायचं राहून गेलं तरी वाचणाऱ्याला कळेलच त्या खासदाराचा कार्यकाळ. राज्यसभेचं सदस्यत्वच तसं आहे म्हटल्यावर. Mayur12025 (चर्चा) १५:१८, १० जुलै २०१९ (IST)Reply


मला आधी 'कालातीत' शब्दच सुचला होता, पण नंतर 'त्रिकालाबाधित' जास्त योग्य वाटला. मला वाटते की दोन्ही शब्दांच्या अर्थांत किरकोळ फरक असावा. 'वर्तमान' आणि 'विद्यमान' हे दोन्ही समानार्थी वाटतात.

आपल्याला 'कालसापे़क्ष'च्या विरुद्ध अर्थाचा शब्द हवा आहे, तो बहुधा 'कालातीत' असावा.

माहिती अद्ययावत केली की शीर्षक बदलावे लागेल, हा मुद्दा पटला. प्रत्येक खासदाराच्या नावापुढे कार्यकाळ नमूद केलेला असेल तर 'जुलै २०१९' लिहावयाची गरज नाही, जसे आहे तसेच चालू द्यावे. ... (चर्चा) २०:३२, १० जुलै २०१९ (IST)Reply

राज्यसभेच्या वर्तमान/विद्यमान/सद्य खासदारांची यादी हा लेख असावा आणि त्यात खासदारांची अद्ययावत यादी असावी. याशिवाय दर दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांनतरची बदललेली यादी जुलै २०१७मधील राज्यसभेच्या खासदारांची यादी, जुलै २०१५मधील राज्यसभेच्या खासदारांची यादी. इ. शीर्षकाखाली असावी.
विकिपीडियावरील माहिती कालातीत असावी परंतु अद्ययावत ही असावी.
अभय नातू (चर्चा) ०१:०६, २६ जुलै २०१९ (IST)Reply
@अभय नातू: स्वतंत्र लेख असावेत हे आपले म्हणणे योग्य आहे. तसेच नागरीकांच्या दृष्टीने नजिकच्या काळात कोण निवृत्त होणार हे महत्वाचे असते असा अनुभव आहे. म्हणून 'जुलै २०१९ मध्ये निवृत्त होणारे राज्यसभा खासदार', 'एप्रिल २०२० मध्ये निवृत्त होणारे राज्यसभा खासदार' असे स्वतंत्र लेख असावेत असे वाटते. त्यांचा जास्त उपयोग होईल. @Mayur12025 आणि :, आपले काय मत आहे? --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३४, २६ जुलै २०१९ (IST)Reply
निवृत्त होणाऱ्या खासदारांसाठी वेगळा लेख न करता विद्यमान राज्यसभेच्या लेखात त्या सदस्यांच्या नावासमोर विशिष्ट खूण द्यावी किंवा त्याच लेखात वेगळा विभाग करावा.
अभय नातू (चर्चा) २०:४३, ३० जुलै २०१९ (IST)Reply
"राज्यसभेच्या वर्तमान खासदारांची यादी" पानाकडे परत चला.