चर्चा:गीतरामायण
कृपया
संपादनकृपया जर आपल्याला संपूर्ण गीत रामायण जर कुठे मिळाले तर या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.
कौस्तुभ समुद्र ०४:२७, ३० नोव्हेंबर २००७ (UTC)
प्रताधिकार
संपादनमाझ्या माहितीप्रमाणे गीतरामायणाचे प्रताधिकार मुक्त नाहीत. तसे नसल्या कृपया दुवा द्यावा. येथे फक्त प्रताधिकारमुक्त लिखाणच ठेवता येते. प्रताधिकारित मजकूर नमुन्यादाखल ठेवण्यास हरकत नाही.
अभय नातू ०४:४४, ३० नोव्हेंबर २००७ (UTC)
मला संपूर्ण गीत रामायण http://geetramaayan.blogspot.com/ या दुव्यावर मिळाले आहे. कृपया प्रताधिकारा संबंधी माहिती कशी पहायची ते सांगावे.
आपला
कौस्तुभ समुद्र ०६:२९, ३० नोव्हेंबर २००७ (UTC) <\blockquote>
- Usually, a work of art is assumed to be copyrighted unless there's proof to show otherwise.
- Geetramayan copyright is probably held by Ga.Di.Maa.'s estate or his publishers. You should find the copyright info on a licensed copy (CD/casette/booklet) of the work.
- अभय नातू ०६:४४, ३० नोव्हेंबर २००७ (UTC)
संपूर्ण गीत रामायण http://www.gadima.com/geet-ramayan/index.php या दुव्यावर सुद्धा आहे (लिखीत स्वरुपात).
कौस्तुभ समुद्र ०७:०५, ३० नोव्हेंबर २००७ (UTC)
- The webmaster/editor of this website (gadima.com) may be able to clarify copyright status of Ga.Di.Maa.'s works.
- अभय नातू ०७:१२, ३० नोव्हेंबर २००७ (UTC)
माझ्या मते गीतरामायणाचे original copyrights आकाशवाणी पुणे केंद्राकडे असावेत, कारण तिथे ते प्रथम प्रसारित झाले. त्यानंतर ते इतर संगीत कंपन्यांकडे विकले गेले असण्याची शक्यता आहे. पण ते public domain मध्ये असतील ह्याची शक्यता कमी वाटते. पण तसे असेल तर ते confirm करून मगच विकिपिडियावर त्याच्या गद्यांचे येथे लिखाण करावे.Ctcliff ०७:१९, ३० नोव्हेंबर २००७ (UTC)
अभय नातू सर
मी स्वतः गदिमांचे नातू श्री. सुमित्र माडगूळकर यांच्याशी संपर्क करून प्रताधिकारांची माहिती घेतली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गीत रामायणाचे सर्व हक्क त्यांचेकडे राखीव आहेत. तरी सुद्धा मराठी विकिपिडीया वर संपूर्ण गीत रामायण लिखित स्वरुपात देण्यास त्यांनी परवानगी दिलेली आहे.
टीप: कृपया आपला विरोपाचा पत्ता दिल्यास मी सदर विरोप आपल्याला पाठवू इच्छितो.
कौस्तुभ समुद्र ०८:२८, ३० नोव्हेंबर २००७ (UTC)
- Wow, that's fantastic. We should make a note of this here officially and mention that the permission applies to marathi wikipedia only and that the matter is still protected under applicable copyrights.
- Please send the email to a n atu@y ahoo. com Remove spaces from the address before sending.
- Thanks much for the effort!
- अभय नातू ०९:५८, ३० नोव्हेंबर २००७ (UTC)
- I'm not sure but i think there is some template displaying copyright informations on english wikipedia.
- I think we can use that here. I'll try to find out..
- कौस्तुभ समुद्र ११:२१, ३० नोव्हेंबर २००७ (UTC)
Wikibook
संपादनThanks for adding this to Wikipedia. My favourite is: दैवजात दु:खे भरता...पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा. Can we have this added in WikiBooks as well?
हेरंब एम. १२:५९, १४ डिसेंबर २००७ (UTC)
मी तो भारलेले झाड!
संपादननमस्कार!,
सर्वप्रथम कौस्तुभ व त्याच्या सर्व सहकार्यांचे अभिनंदन!,गीतरामायण हा मराठी साहित्य व संस्कृतीचा अनमोल ठेवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीच्या हाती सुपूर्द करण्याचे काम विकिपीडिया सारख्या माध्यमातून होते आहे याचा आम्हा माडगूळकर कुटुंबियांना आनंद होतो आहे.गदिमांच्याच शब्दात गीतरामायणाबद्दल सांगायचे तर,
मी तो भारलेले झाड!
अजाणतेपणी केंव्हा माता घाली बाळगुटी
बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी
छंद जाणतेपणीचा,तीर्थे काव्याची धुंडिली
कोण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली
देव वाणीतले ओज शीतळले माझ्या ओठी
वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी
झंकारती कंठ वीणा,येती चांदण्याला सूर
भाव माधुर्याला येई,महाराष्ट्री महापूर
चंद्र भारल्या जीवाला,नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता,मी तो भारलेले झाड
सुमित्र माडगूळकर
http://www.gadima.com
Sumitr.madgulkar १८:४३, २१ डिसेंबर २००७ (UTC)
गीतरामायणाचे रामायण!
संपादनगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला.1 एप्रिल 1955 ते 19 एप्रिल 1956 पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला. साधारण 1953 साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी 28000 श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण 56 गीतांत शब्दबध्द केली आहे.
माडगूळकरांनी श्रीराम कथेचा भाग एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडून गीतातून प्रकट केला आहे,या कथाभागात एकूण 27 व्यक्ती येतात.सर्वाधिक दहा गीते ही श्रीराम या चरित्र नायकाच्या तोंडी आहेत,त्या खालोखाल सीतेची आठ,कौसल्या व लव-कुश प्रत्येकी तीन,दशरथ,विश्वामित्र,लक्ष्मण,सुमंत,भरत,शूर्पणखा व हनुमंत यांच्या तोंडी प्रत्येकी दोन तर निवेदक,यज्ञपुरुष,अयोध्येतील स्त्रिया ,आश्रमीय,अहिल्या आणि इतर सर्वजण यांच्या तोंडी प्रत्येकी एक गीत घातलेले आहे.
संपूर्ण 56 गीतांसाठी सुधीर फडके यांनी 36 रागांचा वापर केला आहे.यात मिश्र काफी चार, मिश्र जोगिया चार, भैरवी चार, भीमपलास, मिश्र मोड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग प्रत्येकी दोन,अशा या 26 रचना सोडल्या तर उर्वरित 30 स्वररचना या 26 रागांत एकेक व दोन लोकगीतांवर आधारित आणि दोन स्वतंत्रपणे निर्मित आहेत.26 रागांत भूप, मिश्र देशकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, राग अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुध्द सारंग, ब्रिंदावनी सारंग, मुलतानी ,तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुध्द कल्याण व मिश्र पहाडी यांचा समावेश आहे.
आकाशवाणीने प्रसारित केलेल्या गीतरामायणाचे निवेदन पुरुषोत्तम जोशी यांनी केले आहे.
गायक व गायिका :सुधीर फडके,माणिक वर्मा,राम फाटक,वसंतराव देशपांडे,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,गजानन वाटवे,ललिता फडके,मालती पांडे,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर ,लता मंगेशकर,सुमन माटे,जानकी अय्यर,सौ.जोग.
वादक : प्रभाकर जोग,अप्पा इनामदार,अण्णा जोशी,सुरेश हळदणकर,केशवराव बडगे.
1) कुश लव रामायण गाती : सुधीर फडके
2) सरयू तीरावरी : प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे
3) उगा का काळिज माझे उले : ललिता फडके
4) उदास कां तूं ? : बबनराव नावडीकर
5) दशरथा,घे हे पायसदान : सुधीर फडके
6) राम जन्मला ग सखी : समूह गान
7) सांवळा ग रामचंद्र : ललिता फडके
8) ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा : राम फाटक
9) मार ही ताटिका रामचंद्रा : राम फाटक
10) चला राघवा चला : चंद्रकांत गोखले
11) आज मी शापमुक्त जाहले : मालती पांडे
12) स्वयंवर झाले सीतेचे : सुधीर फडके
13) व्हायचे राम अयोध्यापति : समूह गान
14) मोडुं नका वचनास : कुमुदिनी पेडणेकर
15) नको रे जाउ रामराया : ललिता फडके
16) रामाविण राज्यपदी कोण बैसतो ? : सुरेश हळदणकर
17) जेथे राघव तेथे सीता : माणिक वर्मा
18) थांब सुमंता,थांबवि रे रथ : समूह गान
19) जय गंगे,जय भागिरथी : समूह गान
20) या इथे लक्ष्मणा,बांध कुटी : सुधीर फडके
21) बोलले इतुके मज श्रीराम : गजानन वाटवे
22) दाटला चोहिकडे अंधार : सुधीर फडके
23) मात न तूं वैरिणी : वसंतराव देशपांडे
24) चापबाण घ्या करीं : सुरेश हळदणकर
25) दैवजात दु:खे भरता : सुधीर फडके
26) तात गेले ,माय गेली,भरत आता पोरका : वसंतराव देशपांडे
27) कोण तू कुठला राजकुमार ? : मालती पांडे
28) सूड घे त्याचा लंकापति : योगिनी जोगळेकर
29) मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा : माणिक वर्मा
30) याचका,थांबु नको दारांत : माणिक वर्मा
31) कोठे सीता जनकनंदिनी ? :सुधीर फडके
32) ही तिच्या वेणिंतिल फुले : सुधीर फडके
33) पळविली रावणें सीता : राम फाटक
34 ) धन्य मी शबरी श्रीरामा! : मालती पांडे
35) सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला : व्ही.एल.इनामदार
36) वालीवध ना,खलनिर्दालन : सुधीर फडके
37) असा हा एकच श्रीहनुमान् : वसंतराव देशपांडे
38) हीच ती रामांची स्वामिनी : व्ही.एल.इनामदार
39) नको करुंस वल्गना : माणिक वर्मा
40) मज सांग अवस्था दूता,रघुनाथांची : माणिक वर्मा
41) पेटवी लंका हनुमंत : प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे
42) सेतू बांधा रे सागरी : सुधीर फडके,समूह गान
43) रघुवरा बोलत कां नाही ? : माणिक वर्मा
44) सुग्रीवा हें साहस असले : सुधीर फडके
45) रावणास सांग अंगदा : सुधीर फडके
46) नभा भेदुनी नाद चालले : प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे
47) लंकेवर काळ कठिण आज पातला : व्ही.एल.इनामदार
48) आज का निष्फळ होती बाण ? : सुधीर फडके
49) भूवरी रावण-वध झाला : समूह गान
50) किति यत्नें मी पुन्हा पाहिली तूंते : सुधीर फडके
51) लोकसाक्ष शुध्दी झाली :सुधीर फडके
52) त्रिवार जयजयकार,रामा : समूह गान
53) प्रभो,मज एकच वर द्यावा : राम फाटक
54) डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे : माणिक वर्मा
55) मज सांग लक्ष्मणा,जाउं कुठे ? : लता मंगेशकर
56) गा बाळांनो,श्रीरामायण :सुधीर फडके
सुमित्र माडगूळकर
http://www.gadima.com
Sumitr.madgulkar १८:५३, २१ डिसेंबर २००७ (UTC)वर्ग:पौराणिक साहित्य
संपादनगीतरामायण अर्वाचीन कृती असल्यामुळे याचा समावेश पौराणिक साहित्य वर्गात करू नये.
अभय नातू १९:३२, ४ डिसेंबर २०११ (UTC)
लेखातील माहितीची खात्री करून हवी
संपादनगीत रामायणच्या १०व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायक चंद्रकांत गोखले आणि अभिनेते चंद्रकांत गोखले या दोन व्यक्ती एकच असल्याचे कन्फर्म करून हवे आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:१७, ३० जून २०१३ (IST)