चर्चा:कृष्णा गाय

(चर्चा:कृष्णातिरी गाय या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by संतोष गोरे

@Goresm: या प्रजातीचे नाव कृष्णा असेच आहे असे पुढील संदर्भस्थळे पाहिले असता दिसते - गौ विश्वकोश, Dairy knowledge portal. आपण कृष्णातिरी नाव कोठून घेतले आहे याचा संदर्भ द्यावा. अन्यथा हा लेख कृष्णा (गाय) या शीर्षकाने करता येईल.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३३, ५ जानेवारी २०२१ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: नमस्कार, कृपया इतर भाषेतील लेख पाहावेत. सर्वत्र kiushna valley हे नाव येते (मी विविध पेज भाषांतरित करून पाहिले). तसेच एकाच गाईचे विविध नावे आढळतात, यात तिच्याच प्रांतात बोली नाव आणि लेखी नाव पण वेगवेगळे येते. आपण फेसबुक व तत्सम ब्लॉग चे संदर्भ घेत नाहीत. काही ठिकाणी कृष्णातिरी (कृष्णा नदीच्या खोऱ्यातील) तर काही ठिकाणी कृष्णा असे नाव आढळते. विकिपीडियावर लिखाणाची शुद्धता असावी म्हणून मी कृष्णातिरी हे नाव घेतले आणि विस्तार करताना दोन्ही नावं लिहिलीत.
संतोष गोरे १०:४७, ५ जानेवारी २०२१ (IST)Reply
प्रश्न आपण भाषांतर करून नाव देण्याचा नाही. अधिकृत काय नावाने मराठीत या प्रजातीला ओळखले जाते हा आहे. आपण आपल्या मताने नामानिधान करणे विकीच्या नियमात बसत नाही. मी दिलेले संदर्भ ब्लॉगचे नाही आहेत. तपासून पहावेत. कन्नड भाषेतील लेख कृष्णा या नावाने आहे. valley चे भाषांतर खोरे होते. मराठीतील अधिकृत नावासाठी संदर्भ शोधूया आणि मग ठरवूया असे वाटते. @अभय नातू आणि : आपणही आपले मत द्यावे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:५९, ५ जानेवारी २०२१ (IST)Reply
@सुबोध कुलकर्णी: कन्नड विकी च्या लेखाची सुरुवात ಕೃಷ್ಣಾ ಅಥವಾ ಕೃಷ್ಣಾತೀರಿ अशी आहे. Google translate वर ऑडिओ मध्ये कृष्णा अथवा कृष्णातिरी असे येते. कृपया लक्षात घ्या मूळ कन्नड लिखाणाचा उच्चार म्हणतोय मी.
संतोष गोरे ११:२९, ५ जानेवारी २०२१ (IST)Reply
या प्रजातीचे शास्त्रीय नाव काय आहे? या नावावरुन अधिक शोध घेउन नाव ठरवावे. ही प्रजाती मुख्यत्वे कर्नाटकात आढळत असल्यास कन्नड नाव ग्राह्य धरावे. -- अभय नातू (चर्चा) ०४:२८, ६ जानेवारी २०२१ (IST)Reply
शास्त्रीय नाव कृष्णा व्हॅली असेच आहे. माहिती घेतली असता महाराष्ट्र व कर्नाटकात कृष्णा या नावानेच संबोधले जाते असे कळले. कृष्णातिरी साठी अधिकृत संदर्भ मिळाला नाही.
यूट्यूब व्हिडिओंमध्ये देशी गायीच्या जातींची चर्चा करणारे व्हिडिओ पाहून त्यातून नावासंदर्भात काही माहिती मिळते का, ते पाहण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्यात या एका हिंदी भाषेतल्या व्हिडिओनुसार (जो बहुधा महाराष्ट्र अथवा उत्तर कर्नाटकातल्या मराठी किंवा कन्नड भाषिकाने निवेदित केला आहे असे वाटते) या गायींना कृष्णा गाय असे म्ह्टले आहे. अन्य एका इंग्लिश भाषेतील व्हिडिओनुसार या जातीस कृष्णा गाय किंवा कृष्णा खोऱ्यातली गाय (कृष्णा व्हॅली काउ) असे म्हटले आहे. मला वाटते कृष्णा (गायींची जात) किंवा कृष्णा (गायींचे वाण) असे लेखाचे नाव ठेवणे उचित ठरू शकेल. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २३:०३, ८ जानेवारी २०२१ (IST)Reply
Native cow varieties of India इथे या प्रजातीचे नाव krisha valley असे असून other names मध्ये krishna tira असे लिहिलेले आहे. - संतोष गोरे ( 💬 ) १८:०४, १० डिसेंबर २०२१ (IST)Reply
"कृष्णा गाय" पानाकडे परत चला.