चर्चा:कातळ खोदशिल्प
@अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी: नमस्कार ! कोकणातील कातळ खोद शिल्पे यांचा अभ्यास सध्या महाराष्ट्रात प्रकर्षाने समोर येतो आहे. या विषयाचे काम प्रत्यक्ष ज्या संशोधक व्यक्तीनी केले आहे त्या सुधीर रिसबुड आणि सुरेंद्र ठाकुरदेसाई यांना विनंती केली असता त्यांनी त्यांचा अहवाल मला पाठविला आहे. कोकणातील कातळशिल्प यावर ही मंडळी नव्यानेच काम करीत असल्याने तसेच यावर पूर्वी झालेले काम नसल्याने याविषयीचा पूर्वसंदर्भ उपलब्ध नाही. त्यामुळे हा लेख करताना मी संदर्भाला वृत्तपत्रिय बातम्या/लेख आणि पुरातत्व विभागाला सादर करीत असलेला अहवाल यांचे संदर्भ वापरीत आहे. हा अहवाल प्रताधिकार मुक्त आहे, त्यात नव्या संशोधनाची भर पडत असते तसेच कोणतीही संस्था त्याचे अधिकार सांगत नाही. अहवाल सर्वाना उपलब्ध आहे. तथापि असे अहवाल संदर्भासाठी वापरताना ते कसे नोंदवावेत याचे कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती. आर्या जोशी (चर्चा) १६:५४, ३० मे २०१८ (IST)
- @आर्या जोशी:,
- आंतरजालावर नसलेले किंवा सर्वदूर उपलब्ध नसलेले संदर्भ येथे नक्कीच देता येतात. असे संदर्भ देताना काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात
- १. असे संदर्भ वापरण्यास कायदेशीर आडकाठी असू नये (उदा. सरकारी गुपिते, व्यावसायिक गुप्त माहिती, इ.)
- २. असे संदर्भ कोणालाही उपलब्ध असावे. विशिष्ट गटालाच वाचण्याची परवानगी असणारे संदर्भ ग्राह्य नाहीत (#१ पहा)
- २.१ असे संदर्भ वाचण्यासाठी मोबदला द्यावा लागत असला तरी चालेल परंतु मुक्त संदर्भ जास्त चांगले.
- ३. हे संदर्भ शक्यतो समसमीक्षित (peer reviewed) असावेत. नसल्यास लेखकाचा विषयवस्तूचा अभ्यास असावा व तो दिसावा, उदा - त्याच विषयात पदवी, संशोधन, पुरस्कार, इ.
- ४. हे संदर्भ कसे वाचावे याची माहिती असावी, उदा - अमुक ग्रंथालयातील हस्तलिखित, विशिष्ट संस्थेने तयार केलेला अहवाल मिळविण्यासाठीचा पत्रव्यवहार किंवा इतर संपर्कपद्धतीचा पत्ता
- असे संदर्भ देण्यासाठी अनेक साचे उपलब्ध आहेत. {{स्रोत पुस्तक}} हा त्यातील एक. @Tiven2240: यांना अधिक माहिती असतील. इंग्लिश विकिपीडियावर जर्नलचा संदर्भ देणारा साचा आहे तो येथे आयात करता येईल.
- अभय नातू (चर्चा) २३:२१, १ जून २०१८ (IST)
{{जर्नल स्रोत}} हे मराठी विकिपीडियावर उपलब्ध आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २३:३१, १ जून २०१८ (IST)
@अभय नातू आणि Tiven2240: आभारी आहे. आर्या जोशी (चर्चा) ०९:४३, २ जून २०१८ (IST)
@अभय नातू आणि Tiven2240: नमस्कार! पेट्रोग्लीफ आणि राॅक आर्ट या दोनपैकी कोणताही शब्द शोधल्यास हाच लेख उघडेल यासाठी पुनर्निदेशन करायचे आहे.आपण सहाय्य करावे ही विनंती! तांत्रिक बाबींमधे मला काही गोष्टी शिकायला अजून वेळ लागतो अहे.आर्या जोशी (चर्चा) २०:२१, ७ जून २०१८ (IST)
झाले.. हे शीर्षक (कातळ खोद शिल्प (चित्र)) हे बोजड वाटते आहे. यासाठी सुटसुटीत मराठी शब्द आहे का? -- अभय नातू (चर्चा) २०:२५, ७ जून २०१८ (IST)