घाटल लोकसभा मतदारसंघ

घाटल हा भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील ४२ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आला. ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ पश्चिम मिदनापूर तर १ विधानसभा मतदारसंघ पूर्व मिदनापूर जिल्ह्यामध्ये आहेत.

२००८ साली पंस्कुरा लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व घाटल हा नवा मतदारसंघ तयार केला गेला. ह्यापूर्वी १९५१ ते १९७७ दरम्यान हा मतदारसंघ अस्तित्वात होता.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ निकुंजा चौधरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
दुसरी लोकसभा १९५७-६२ निकुंजा मैती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ सचिंद्र चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ परिमल घोष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ जगदीश भट्टाचार्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ गुरूदास दासगुप्ता भारतीय कम्युनिस्ट पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ देव (अभिनेता) तृणमूल काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९-

बाह्य दुवे संपादन

साचा:पश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ