ग्रामजागर साहित्य संमेलन

पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे एक जगद्‌गुरू संत तुकाराम ग्रामजागर साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरत असते. २०१५ साली हे संमेलन देहू या गावी २४-२५ जानेवारी २०१५ या तारखांना झाले. डॉ. कोत्तापल्ले या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनात ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ’शेती, शिवार आणि कृषी संस्कृती’ या विषयावर एक चर्चासत्र झाले.. या चर्चासत्रात झालेले त्यांचे भाषण आयुष्यातील अखेरचे भाषण होते.

यापूर्वी झालेल्या एका ग्रामजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी विठ्ठल वाघ होते.

२३-२४ ओक्टोबर २००४ या तारखांना राळेगण सिद्धी येथे झालेल्या ग्रामजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे होते.

या नावाची अन्य काही साहित्य संमेलने आहेत. उदा०

  • चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन
  • तुकाराम ग्रामजागर साहित्य संमेलन
  • यशवंतराव ग्रामजागर साहित्य संमेलन
  • यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संएलन


पहा : साहित्य संमेलने