गुणवंतगड

सातारा जिल्ह्यातील गड

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये पाटण जवळील हा गड मोरगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.

गुणवंतगड
गुणवंतगड.jpg
मोरगिरी गावातून दिसणारा गुणवंतगड
नाव गुणवंतगड
उंची १००० फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण सातारा, महाराष्ट्र
जवळचे गाव पाटण,मोरगिरी गाव
डोंगररांग बामणोली
सध्याची अवस्था नष्ट होण्याच्या मार्गावर
स्थापना {{{स्थापना}}}


स्थानसंपादन करा

 
नकाशा

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटण गावाच्या पश्चिम-नैऋत्य(WSW) दिशेला दहा किलोमीटरवर हा गड आहे. पश्चिम-वायव्येला दातगड आहे आणि दोन्ही गडांमधून कोयना नदी आणि हेळवाक-पाटण रस्ता जातो.

इतिहाससंपादन करा

१८ व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला गेला होता. त्याआधी टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असावा. इ.स. १८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपवण्यात आला.

गडावरील प्रेक्षणीय स्थळेसंपादन करा

सध्या गडावर इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत. फक्त एक विहीर आहे.

संदर्भसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा