गीतांजली श्री
गीतांजली श्री (जन्म: १२ जून १९५७) उर्फ गीतांजली पांडे या नवी दिल्ली, भारत येथे राहणाऱ्या एक हिंदी कादंबरीकार आणि लघु-कथा लेखिका आहेत. त्यांनी अनेक लघुकथा आणि पाच कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांनी २००० साली लिहिलेली कादंबरी माई २००१ मध्ये क्रॉसवर्ड बुक अवॉर्डसाठी निवडली गेली आणि नीता कुमार यांनी केलेला या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद २०१७ मध्ये नियोगी बुक्सने प्रकाशित केला.
Indian writer | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | गीतांजलि श्री |
---|---|
जन्म तारीख | इ.स. १९५७ मैनपुरी |
नागरिकत्व | |
शिक्षण घेतलेली संस्था | |
व्यवसाय | |
कार्यक्षेत्र |
|
वैवाहिक जोडीदार |
|
उल्लेखनीय कार्य |
|
पुरस्कार |
|
२०२२ मध्ये, डेझी रॉकवेल यांनी टोम्ब ऑफ सॅन्ड या नावाने इंग्रजीत अनुवादित केलेल्या गीतांजली श्री यांच्या रेत समाधी या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले.[१] हे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत. काल्पनिक कथांव्यतिरिक्त त्यांनी प्रेमचंद यांच्यावर समीक्षात्मक लेखन केले आहे.
वैयक्तिक आयुष्य
संपादनगीतांजली यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील मैनपुरी शहरात झाला. त्यांचे वडील अनिरुद्ध पांडे हे सरकारी अधिकारी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे उत्तर प्रदेशातील विविध गावांमध्ये वास्तव्य झाले.
गीतांजली यांनी लेडी श्रीराम कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली. [२]त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली.[२] बडोद्यातील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून लेखक प्रेमचंद यांच्यावर पीएचडी करत असताना त्यांची हिंदी साहित्यातील रुची वाढली.[२] त्यांनी पीएचडी करत असताना आपली पहिली कथा लिहिली आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर लेखनाला सुरुवात केली.
लेखनातील कारकीर्द
संपादनगीतांजली याची पहिली कथा 'बेल पत्र' (१९८७) हंस या मासिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९९१ मध्ये त्यांचा लघुकथा संग्रह 'अनुगूंज' प्रकाशित झाला. त्यांच्या 'माई' कादंबरीच्या नीता कुमार यांनी केलेल्या इंग्रजी भाषांतराने गीतांजलींना प्रसिद्धी मिळवून दिली. [३]नीता कुमार यांना या अनुवादासाठी साहित्य अकादमीचा अनुवादाचा पुरस्कार मिळाला. या कादंबरीचे उर्दू, फ्रेंच, कोरियन, सर्बियन, जर्मन इ. भाषांमध्येसुद्धा अनुवाद करण्यात आले आहेत.
गीतांजली श्री यांची दुसरी कादंबरी 'हमारा शहर उस बरस' ही बाबरी मशीद पाडल्यावरच्या घटनांवर आधारित आहे. त्यांची चौथी कादंबरी 'खाली जगह' इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली.
त्यांच्या 'रेत समाधी' या पाचव्या कादंबरीचा डेझी रॉकवेल यांनी इंग्रजीमध्ये टोम्ब ऑफ सॅन्ड या नावाने अनुवाद केला. २६ मे २०२२ रोजी या अनुवादाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक मिळवणारे हे पहिले हिंदी पुस्तक ठरले आणि गीतांजली श्री या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरल्या.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Geetanjali Shree is first Indian winner of International Booker Prize" (इंग्रजी भाषेत). 2022-05-27.
- ^ a b c May 28, TNN /; 2022; Ist, 03:29. "Geetanjali Shree Got Her Phd Degree From Msu | Vadodara News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-07-14 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ श्री, गीतांजलि (2000). Mai (इंग्रजी भाषेत). Kali for Women. ISBN 978-81-86706-18-3.