जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) हे एक नवी दिल्लीमधील विद्यापीठ आहे. त्याची स्थापना १९६९ मध्ये झाली. विद्यापीठाची स्थापना संसदेच्या अधिनियमाने केली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर विद्यापीठचे नाव ठेवले गेले.
नवी दिल्लीतील सार्वजनिक केंद्रीय विद्यापीठ, भारत | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | सरकारी विद्यापीठ | ||
---|---|---|---|
याचे नावाने नामकरण | |||
स्थान | नवी दिल्ली, नवी दिल्ली जिल्हा, Delhi division, National Capital Territory of Delhi, भारत | ||
मुख्यालयाचे स्थान |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
इतिहास
संपादनजी. पार्थार्थी हे विद्यापीठचे पहिले कुलगुरू होते. प्रा.मुनीस रझा हे संस्थापक अध्यक्ष आणि निरीक्षक होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्थापनेचे विधेयक १ सप्टेंबर १९६५ रोजी तत्कालीन शिक्षणमंत्री एम. सी. चागला यांनी राज्यसभेत ठेवले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान खासदार भूषण गुप्ता यांनी हे आणखी एक विद्यापीठ होऊ नये, असे मत व्यक्त केले. वैज्ञानिक समाजवादासह नवीन विद्याशाखा तयार केल्या पाहिजेत आणि या विद्यापीठाने एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की त्यांनी उदात्त कल्पना मनात ठेवल्या पाहिजेत आणि समाजातील दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रदान केला पाहिजे. जेएनयू विधेयक १६ नोव्हेंबर १९६६ रोजी लोकसभेत मंजूर झाले आणि जेएनयू कायदा २२ एप्रिल १९६९ रोजी लागू झाला.
सामाजिक सक्रियता आणि वाद
संपादनजेएनयू कॅम्पसमध्ये जीवन तीव्र राजकीय घाडामोडींनी भरलेले आहे. जे विद्यार्थी कॅम्पस सोडतात ते विद्यार्थी राजकारणाच्या परिणामी जीवनाबद्दल कायमचा बदललेला दृष्टीकोन घेतात असे म्हणतात. कॅम्पस जीवनात राजकारणामुळे स्त्रीवाद, अल्पसंख्याक हक्क, सामाजिक आणि आर्थिक न्याय यासारख्या सामाजिक विषयांत भाग घेतला जातो. अशा सर्व बाबी औपचारिक आणि अनौपचारिक मेळाव्यात जोरदारपणे चर्चेत असतात. जेएनयू विद्यार्थ्यांचे राजकारण डावे केंद्रीत आहे, जरी अलिकडच्या वर्षांत, उजव्या विचारांच्या विद्यार्थी गटांनीही या क्षेत्रात प्रवेश केला आहे. विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आधी वादविवाद आणि बैठका घेऊन सर्व विद्यार्थ्यांना राजकारणात समावुन घेतात.[१]
फेब्रुवारी २०१६ मध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया कुमार यांना अन्वये "तुकडे तुकडे टोळी" साठी देशद्रोहच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. निषेध मेळाव्यात "पाकिस्तान झिंदाबाद", "काश्मीर की आजादी तक जंग चलेगी, भारत की बरबादी तक जंग चलेगी" अफजल हम शरमिंदा हे तेरे कातील जिन्दा हे भारत तेरे तुकडे होंगे इंशह अल्ला ,अशा भारतविरोधी घोषणा काढण्यात आले असा आरोप झाला. त्यांच्या अटकेमुळे देशात राजकीय गोंधळ उडाला आणि शैक्षणिक कार्यकर्ते सरकारच्या या निर्णयाविरोधात मोर्चा काढत निषेध करत होते. निर्णायक पुराव्यांच्या अभावामुळे २ मार्च २०१६ रोजी जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली होती.[२] १३ जानेवारी २०१९ रोजी दिल्ली पोलिसांनी कुमार आणि इतरांविरुद्ध २०१६ मध्ये दाखल केलेल्या देशद्रोहाच्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले.[३]
क्रमांक
संपादनजवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे भारतातील आघाडीचे विद्यापीठ आहे, आणि अध्यापन आणि संशोधनाचे जागतिक नामांकित केंद्र आहे. २०१६ मध्ये भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क मध्ये तिसरा क्रमांक व २०१७ मध्ये दुसरा क्रमांक मिळाला होता.[४]
उल्लेखनीय माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक
संपादनमाजी विद्यार्थी
संपादनविद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते प्रो. अभिजित बॅनर्जी, लिबियाचे माजी पंतप्रधान अली झेईदान आणि नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टराई तसेच अनेक राजकारणी (निर्मला सीतारामन्, सीताराम येचुरी), कलाकार (स्वरा भास्कर), शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ (आलोक भट्टाचार्य, सुमन कुमार धार) यांचा समावेश आहे.
प्राध्यापक
संपादनभाषाविज्ञान विभागात जेएनयूमध्ये प्राध्यापक म्हणून विविध लेखक होते जसे अंविता अब्बी, आयशा किदवई, मकरंद परांजपे.
संदर्भ
संपादन- ^ Roy Chowdhury, Sharmishtha (2013). "Jawaharlal Nehru University". In Mary Elizabeth Devine; Carol Summerfield (eds.). International Dictionary of University Histories. Routledge. pp. 224–227. ISBN 978-1-134-26210-6.
- ^ Mathur, Aneesha (March 3, 2016). "JNU row: Kanhaiya Kumar gets bail and a lesson on thoughts that 'infect… (like) gangrene'". The Indian Express. January 29, 2018 रोजी पाहिले.
- ^ "JNU case: Delhi Police charge Kanhaiya Kumar, others with sedition | Delhi News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया.
- ^ Jawaharlal Nehru University