गारोन (फ्रेंच: Garonne, ऑक्सितान, कातालानस्पॅनिश: Garona) ही फ्रान्समधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी फ्रान्सस्पेन देशांच्या सीमेवरील पिरेनीज पर्वतरांगेत उगम पावते. एकूण ६०२ किमी लांबीची गारोन नदी उत्तर व पूर्वेस वाहून अटलांटिक महासागराला मिळते.

गारोन
Garonne
गारोनच्या काठांवर वसलेले बोर्दू
गारोन नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम पिरेनीज
मुख बिस्केचे आखात
पाणलोट क्षेत्रामधील देश फ्रान्स, स्पेन
लांबी ६०२ किमी (३७४ मैल)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ८४,८११

गारोन नदी फ्रान्सच्या ऑत-गारोन, तार्न-एत-गारोन, लोत-एत-गारोन, जिरोंदशारांत-मरितीम ह्या विभागांमधून वाहते.

तुलूझ, आजें, बोर्दूरोयां ही गारोनच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत