क्षय रोग
क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.
- ते अवयव
- मेंदूची आवरणे,
- मणके व इतर हाडे,
- लैंगिक अवयव.
प्रसार | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | notifiable disease (स्वित्झर्लंड), class of disease, रोग | ||
---|---|---|---|
उपवर्ग | primary bacterial infectious disease, mycobacterium infectious disease, endemic disease, संसर्गजन्य रोग, रोग, emerging communicable disease | ||
मध्ये प्रकाशित |
| ||
मृत्युंची संख्या |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
असे म्हणतात कि यासारखेच आहे | consumption | ||
| |||
प्रकार
संपादन- फुफ्फुसाचा क्षयरोग
- दूषित थुंकी (स्पुटम पॉसिटिव्ह)
- अदूषित थुंकी (स्पुटम निगेटिव्ह)
- फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा
- ग्रंथीचा क्षय्ररोग ( लिम्फ नोड )
- हाडाचा व सांध्याचा क्षय्ररोग
- जनन व विसर्जन संस्थाचा क्षयरोरोग (जनायटो-युरिनरी ट्रॅक्ट )
- मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टिम )
- आतडयाचा क्षय्ररोग
- क्षय रोगाची लक्षणे
- कमी होणारे वजन
- थकवा जाणवणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- ताप येणे
- रात्री येणारा घाम
- भूक न लागणे
- आजार टाळण्याचे उपाय "
क्षय रोगापासून वाचण्यासाठी जन्म झालेल्या लहान बाळाला बी.सी.जी नावाची लस दिली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.
क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे
- पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे.
- क्षय रोग तपासण्या करून घेणे
- क्षय रोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे
- तोंड झाकणे
लक्षणे
संपादनदोन आठवडय़ांहून अधिक काळ
- बेडकायुक्त खोकला (१५ दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा )
- हलकासा परंतु रात्री येणारा ताप
- घटणारे वजन.
- भूक कमी होणे.
- बेडक्यातून रक्त पडणे.
- थकवा
- छातीत दुखणे
- रात्री येणारा घाम
- मानेला गाठी येणे (इंग्लिश: Lymph Node - लिम्फ नोड )
जीवाणू पसरण्याचे मार्ग
संपादनउपचार न घेतलेला क्षयरोगाचा एक रुग्ण वर्षभरात १० ते १५ व्यक्तींना संसर्ग करू शकतो दाट लोकवस्ती, कोंदट घरे, प्रदूषण, एड्सचे वाढते प्रमाण, कुपोषण, अस्वच्छता, अपुरे/चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी हा रोग होतो.
- दूषित धुलिकण
- बाधित व्यक्तीची थुंकी.
- बाधित व्यक्तीचे इतर स्राव
क्षय रोग होण्याची जास्ती शक्यता असलेले लोक
संपादन- जास्ती वय असलेले
- लहान बाळे
- दुसऱ्या कोणत्यातरी कारणांनी ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आहे असे
- कमी पोषकता
- दारूच्या आहारी गेलेले
- जास्ती गर्दीच्या ठिकाणी राहणारे
- अस्वच्छतेत राहणारे
उपचार
संपादन- सहा ते नऊ महिन्यांकरिता विविध औषधोपचाराच्या पद्धती
- औषधोपचार खूप कालावधीसाठी चालतो कारण ह्या रोगाचे जीवाणू खूप हळूहळू वाढतात व अौपधोपचाराने खूप हळूहळू मरतात.
- जीवाणू कमी करण्यासाठी विविध औषधे घ्यावी लागतात.
निदान
संपादनखकाऱ्याची तपासणी, एक्सरे, रक्ताच्या चाचण्या यांवरून या क्षयरोगाचे रोगनिदान केले जाते.
चाचण्या-
- खकाऱ्याची तपासणी-
- वयस्कांमध्ये- सकाळीचचा खकारा निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिअल नेल्सन स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देउन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते. यामध्ये जर जीवाण् सापडले तर अशा रुग्णास थुंकी दूषित रुग्ण समजले जाते.
- लहान मुलांमध्ये- सकाळीच उपाशीपोटी अन्ननलिकेतून एनजीटी टाकून जठरातील द्रव निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिनलेन्स स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देऊन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते.
- मॉन्टुक्स टेस्टद्वारेही रोगाचे निदान केले जाते.
- रक्ताच्या तपासण्या-
- इएसआर- (एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट) यामध्ये रक्ताचा नमुना न गोठू देणाऱ्या द्रवाच्या सहाय्याने संकलित करून तो नलिकेमध्ये भरला जातो व त्या नलिकेवरील आकड्यांनुसार नोंद घेतली जाते. ही तपासणी विश्वासार्ह नाही, कारण इतर रोगांमध्येही ही तपासणी असामान्य असू शकते[ संदर्भ हवा ].
आजारपणातील घ्यावयाची काळजी
संपादन- खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे.
- खूप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक (डेटॉल, सेव्हलॉन, इ.) घालून त्यातच थुंकावे; इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे.
- रुग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी
- लहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे
- घरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते.
उपलब्ध उपचार
संपादनक्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही प्रतिजैविक औषधे आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दीड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. खोकला कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे जीवाणू तेथे येतात औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो.
औषधांचे दुष्परिणाम
संपादनया औषधांचे काही दुष्परिणाम दिसू शकतात. उदा.- सांधेदुखी, हाता-पायांना जळजळ, बधीरता, काविळ, दृष्टीदोष, कमी ऐकू येणे, लघवीस लाल रंग, मळमळ, उलटी इत्यादी. पण सहसा रुग्ण औषधांना सरावतात व फारसे दुष्परिणाम न होता उपचार घेऊ शकतात. पण कुठल्याही दुष्परिणामाची थोडी जरी शक्यता वाटली तरी स्वतःच उपचार बंद करू नयेत. त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य असते.पण हा रोग बरा होतो
आजार टाळण्यासाठीची काळजी
संपादनसमतोल आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे अशी काही पथ्ये पाळल्यास प्रतिकारशक्ती उत्तम ठेवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वच्छता बाळगणे जरूरीचे असते.
इतर प्रकार
संपादनफुफुसाखेरीज इतर अवयवांना होणाऱ्या क्षयरोगाला एक्स्ट्रा पल्मोनरी टी.बी. म्हणतात. हाडे, मेंदू, मूत्राशय, अन्ननलिका अशा कुठल्याही अवयवाला क्षयरोगाची लागण होते. हा क्षयरोगाचा प्रकार मात्र संसर्गजन्य नसतो.
उपचार
संपादनभारत सरकारचे क्षयरोग नियंत्रणासाठी युद्धपातळीवरून प्रयत्न चालू आहेत. डॉट्स या उपक्रमात मोफत तपासणी व पूर्ण कालावधीसाठी मोफत उपचार सरकारी इस्पितळात केले जातात. पूर्ण उपचार आरोग्य सेवकांच्या निरीक्षणासाठी दिले जातात. त्यामुळे उपचार अर्धवट, अनियमित घेणे या शक्यता राहात नाहीत. रुग्ण पूर्ण बरा होतोच, ‘रेझिस्टंट टी.बी.’ची शक्यताही कमी होते.सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉटस् म्हणजे डायरेक्टली ऑब्जर्व्ह ट्रीटमेंट वूईथ शॉर्टटर्म केमोथेरपी नावाचा औषधोपचार क्षयरोगावर केला जातो.सहा महिने व आठ महिने असा हा उपचाराचा कालावधी असून नवीन क्षयरोग्यांनी सुरुवातीचे सहा महिने डॉटस्ची औषधी व्यवस्थीत घेऊन त्याची तपासणी दिलेल्या वेळेत केल्यास हा आजार १०० टक्के पूर्ण बरा होतो. सध्या खात्रीशीर उपचार म्हणून या डॉटस् उपचार प्रणालीकडे पाहिले जाते.ही उपचार पद्धती सरकारी दवाखान्यातून मोफत दिली जाते. क्षयरूग्णाला डॉटस् उपचार सुरू झाल्यास रूग्णाच्या गावातच त्याला आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी वर्कर अशा वर्कर यांच्या मार्फत डॉटस् दिला जातो. सध्या टी. बी.च्या निदानासाठी सलग दोन आठवडय़ांसाठी बेडक्या सह किंवा कोरडा खोकला असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रातील टी. बी. उपचार केंद्रावर बेडकाची तपासणी करावी असे निर्देश आहे. निदानासाठी दोन बेडकांचे सॅम्पल्स आवश्यक असतात. यात सकाळी उठल्यावरचे पहिले बेडके ब लॅबमध्ये पोहोचल्यावर एक स्पॉट सॅम्पल द्यावे लागते. हे दोन्ही सॅम्पल निगेटिव्ह आल्यास एक आठवडा ब्रॉड स्पेक्ट्म ॲंटीबायोटीक्सचा कोर्स दिला जातो. त्यानंतर पुन्हा दोन बेडक्यांच्या तपासण्या व छातीचा एक्स रे करून टी.बी.ची तपासणी केली जाते. हे दोन्ही निगेटिव्ह आल्यास टी. बी. नसल्याचे निदान केले जाते. पण यापैकी कुठली ही गोष्ट पॉझिटीव्ह आल्यास टी. बी.चे निदान करून उपचार पूर्ण करावे लागतात. टी. बी.च्या उपचारांसाठी तीव्रतेप्रमाणे तीन कॅटॅगिरीज ठरवून त्याप्रमाणे कुठली औषधे व किती दिवस घ्यावी हे सूत्र ठरवून दिले आहे. ही औषधे डॉट्स म्हणजेच डायरेक्ट ऑबरव्हेश ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स कीमोथेरपी केंद्रावर मोफत उपलब्ध असतात. क्षयरोगाचे निदान झाल्यावर पहिले दोन ते तीन महिने औषधे एक दिवस आड म्हणजेच डॉट्स कार्यकर्त्यांच्या देखरेखीखाली घ्यावयाची असतात. त्यानंतरचे ४-५ महिने ही औषधे प्रत्येक आठवड्याला डॉट्स केंद्रात जाऊन घ्यावयाची असतात.
इतिहास
संपादनरॉबर्ट कॉक याने क्षयरोगास कारणीभूत असणारा मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसिस हा जीवाणु मुंबई येथील ग्रांट वैद्यकीय महाविद्यालय व सर ज़े जे रुग्णालयात काम करत असताना शोधला. सर जे जे रुग्णालयात रोगविक्रुतिशास्त्र (pathology) विभागात कॉकची खोली (koch's room) जतन करण्यात आली आहे. रॉबर्ट कॉकच्या योगदानाबद्दल नोबेल पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले.