अन्ननलिका (इं:esophagus) ही एक स्नायुयुक्त नलिका असते जी घसा ते जठराचे वरचे मुख यांना जोडते. नलिकेतून अन्न स्नायुंच्या हलचालींच्या साहाय्याने पुढे ढकलले जाते.

अन्न नलिका (लाल रंगात दर्शविलेली)

शरीरशास्त्र संपादन

मानवी अन्ननलिका मानेच्या मणका क्र्.६ ते पाठीचा मणका क्र. १० च्या स्तरापर्यंत असते. तिची लांबी २०-२५ से.मी. पर्यंत असते. अन्ननलिकेची आतील बाजूस स्तरीकृत स्क्वैमस उपकला (Stetified Squamous Epithelium) असते.