क्लेमेंट ॲटली
१९४५ ते१९५१ पर्यंत युनायटेड किंगडमचे पंतप्रधान
(क्लेमेंट एटली या पानावरून पुनर्निर्देशित)
क्लेमेंट ॲटली (इंग्लिश: Clement Attlee; ३ जानेवारी १८८३ - ८ ऑक्टोबर १९६७) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. दुसऱ्या महायुद्धकाळात चर्चिलच्या सरकारात उप-पंतप्रधानपदी असलेल्या ॲटलीच्या मजूर पक्षाने १९४५ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवले व ॲटली पंतप्रधान बनला.
क्लेमेंट ॲटली | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २६ जुलै १९४५ – २६ ऑक्टोबर १९५१ | |
राजा | सहावा जॉर्ज |
---|---|
मागील | विन्स्टन चर्चिल |
पुढील | विन्स्टन चर्चिल |
जन्म | ३ जानेवारी, १८८३ लंडन, इंग्लंड |
मृत्यू | ८ ऑक्टोबर, १९६७ (वय ८४) लंडन, इंग्लंड |
महायुद्धानंतरच्या पुनर्बांधणीमध्ये ॲटली सरकारने ब्रिटनमधील अनेक पायाभुत सुविधा बळकट केल्या. तसेच ॲटलीच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने भारत, पाकिस्तान, सिलोन, बर्मा, जॉर्डन इत्यादी वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले. तसेच पॅलेस्टाईनमधील ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यामुळे स्वतंत्र इस्रायल देशाचा मार्ग खुला झाला.
बाह्य दुवे
संपादन- डाउनिंग स्ट्रीट अधिकृत संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर) (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत