क्रांति माधव साडेकर उर्फ क्रांति, रूह (ऑक्टोबर २०, इ.स. १९६२ - हयात) या मराठी कवयित्री व लेखिका आहेत.

क्रांति साडेकर
जन्म नाव सौ. क्रांति माधव साडेकर
टोपणनाव क्रांति / रूह
जन्म ऑक्टोबर २०, इ.स. १९६२
कार्यक्षेत्र साहित्य,
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता

क्रांति साडेकर यांनी एम. ए. पदवी अभ्यासक्रमापर्यंत शिक्षण केले.

प्रकाशित साहित्य

संपादन
शीर्षक साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशनवर्ष (इ.स.) भाषा
अग्नीसखा [१] काव्यसंग्रह विजय प्रकाशन २८ जुलै २०११ मराठी
असेही तसेही काव्यसंग्रह (गझलसंग्रह) विजय प्रकाशन २८ जुलै २०११ मराठी
काव्य मकरंद काव्यसंग्रह (सामूहिक) विजय प्रकाशन १ जानेवारी २०१३ मराठी

पुरस्कार

संपादन
  1. असेही-तसेही या गझलसंग्रहाला विदर्भ साहित्य संघ संस्थेचा नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार. [२][३]

सहभाग

संपादन
  1. वाशीम येथे आयोजित ६१ वे विदर्भ साहित्य संमेलन,
  2. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर शाखेचा उपक्रम ‘नव्या जाणिवांचे कवी’,
  3. आकाशवाणी तसेच अन्य स्थानिक व महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या कार्यक्रमांत काव्यवाचन. [४]
  4. तसेच लोकमत व अन्य दिवाळी अंकांसाठी कविता लेखन.
  5. कवितासंग्रहांवर अभ्यासपूर्ण विवेचन आणि कविता संग्रहांच्या प्रकाशनामध्ये अध्यक्ष म्हणून सहभाग [५]

अन्य [आंतरजालीय]

संपादन
  1. आंतरजालावरील [Internet] दिवाळी अंकांसाठी संपादन सहाय्य, [६]
  2. विविध काव्यस्पर्धांचे परिक्षण,
  3. फेसबुकवर आणि ऑर्कुटवर कार्यरत असलेल्या ‘मराठी कविता समूह’ या काव्यसमूहाचे संचालन,
  4. कवितासमूहातील विविध उपक्रमांचे आयोजन व संचालन,
  5. ‘मराठी साहित्य समूह’ या ललित लेखनविषयक समुहाचे संचालन,
  6. काव्यविषयक व ललितलेखनविषयक चर्चांमध्ये सक्रीय सहभाग,
  7. ‘मराठी कविता समूह’ या काव्यसमूहाचे ‘कविताविश्व’ या ई-पुस्तक प्रकाशनाच्या कविताविषयक ई-पुस्तकांचे संपादन,
  8. मायबोली, मिसळपाव, सुरेशभट, ऐलपैल, मीमराठी अशा अनेक संस्थळांवर काव्य व ललितलेखन.

ब्लॉग्ज

संपादन
  1. अग्निसखा [मराठी कविता],
  2. रूह की शायरी [हिंदी-उर्दू कविता],
  3. सृजनस्वप्न [ललितलेखन]

संदर्भ

संपादन
  1. ^ [१]लोकसत्ता ला आलेली पुस्तकांची बातमी
  2. ^ [२] पुरस्कारावर मायबोली वर प्रकाशित लेख.
  3. ^ [३] Archived 2012-04-15 at the Wayback Machine.डहाकेंच्या भाषणाचा सकाळ मधे आलेला लेख
  4. ^ [४]मायबोली संकेतस्थळावरील 'चांदणे शिपीत जा' चा उल्लेख
  5. ^ [५] Archived 2013-01-10 at the Wayback Machine.महाराष्ट्र टाईम्स मधे प्रकाशित तुष्की च्या कार्यक्रमाचा उल्लेख
  6. ^ [६]मोगरा फुलला २०१० चा अंक