कोर्दोबा
कोर्दोबा (स्पॅनिश: Córdoba) हे स्पेन देशाच्या आंदालुसिया स्वायत्त संघामधील एक ऐतिहासिक शहर आहे. कोर्दोबा शहर स्पेनच्या दक्षिण भागात ग्वादालक्विव्हिर नदीच्या काठावर वसले आहे. २०१४ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.२८ लाख होती.
कोर्दोबा Córdoba |
|||
स्पेनमधील शहर | |||
कोर्दोबामधील रोमन पूल |
|||
| |||
देश | ![]() |
||
राज्य | आंदालुसिया | ||
प्रांत | कोर्दोबा | ||
स्थापना वर्ष | इ.स.पू. १६९ | ||
क्षेत्रफळ | १,२५५.२ चौ. किमी (४८४.६ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ३९० फूट (१२० मी) | ||
लोकसंख्या (२०१४) | |||
- शहर | ३,२८,०४१ | ||
- घनता | २६१ /चौ. किमी (६८० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
www.cordoba.es |
कोर्दोबा शहराला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. हे शहर रोमन प्रजासत्ताक व रोमन साम्राज्यातील प्रांतांच्या राजधानीचे शहर होते. आठव्या शतकामध्ये आयबेरियन द्वीपकल्प मुस्लिमांच्या अधिपत्याखाली आल्यानंतर कोर्दोबा कोर्दोबाची अमिरात व कोर्दोबाची खिलाफत ह्या राज्यांची राजधानी होती. दहाव्या शतकामध्ये कोर्दोबा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर होते असा अंदाज व्यक्त केल गेला आहे[१]. ह्या काळात कोर्दोबा इस्लामिक संस्कृतीचे शैक्षणिक केंद्र होते. सध्या कोर्दोबा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
प्रमुख आकर्षणे | |||||||||
|
संदर्भ आणि नोंदीसंपादन करा
- ^ "Largest Cities Through History". Geography.about.com. 2012-04-09. Archived from the original on 2016-08-18. 2013-03-26 रोजी पाहिले.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |