कोरेगाव किंवा कोरेगाव भिमा (अन्य नावे व लेखनभेद: भीमा कोरेगाव, भिमा कोरेगाव, कोरेगाव भीमा, कोरेगांव) हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारतातील एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्टया, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६०वरील शिक्रापूर गावाच्या नैर्ऋत्येकडे आणि पुणे शहराच्या ईशान्येला २८ किमी अंतरावर आहे. गावात ग्रामपंचायत आहे.[ संदर्भ हवा ]

कोरेगावातील ब्रिटिश-पेशवे लढाईत ब्रिटिश व महारांचा विजयस्तंभ

इतिहाससंपादन करा

मुख्य लेख: कोरेगावची लढाई

१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगावमध्ये ब्रिटिश व पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. ब्रिटिशांचे ८३४ सैनिक ज्यात सुमारे ५०० महार सैनिक व पेशव्यांचे २८,००० सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ब्रिटिश-महार सैनिकांचा या लढाईत विजय झाला होता.[ संदर्भ हवा ]

लोकसंख्यासंपादन करा

इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यांपैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे. गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या ११.५४% तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २.०३% आहे.[१]

कोरेगाव भिमा आणि महार लोकांच्या स्तंभ चां काहीही संबंध नाही नाहीसंपादन करा

गावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% हिंदू, ५.२५% मुसलमान, १.९६% बौद्ध, ०.४२ ख्रिस्ती, ०.४० जैन, ०.०५% शीख, ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ निधर्मी आहेत.[२]

कोरेगाव भीमा विषयक पुस्तकेसंपादन करा

  • भीमा कोरेगावचा क्रांती संग्राम ( लेखक - युवराज सोनवणे, राष्ट्रनिर्माण प्रकाशन, शिरूर कासार)
  • कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक (लेखक - कॉम्रेड भीमराव बनसोड)

संदर्भसंपादन करा