कोटा किनाबालू
कोटा किनाबालू (मलाय: Kota Kinabalu; जावी लिपी: کوتا کينا بالو; जुने नाव: जेसल्टन) ही मलेशिया देशाच्या साबा राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. कोटा किनाबालू शहर बोर्नियो बेटाच्या ईशान्य भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.
कोटा किनाबालू Kota Kinabalu |
|||
मलेशियामधील शहर | |||
| |||
देश | ![]() |
||
बेट | बोर्नियो | ||
राज्य | साबा | ||
स्थापना वर्ष | १८८२ | ||
क्षेत्रफळ | ३५१ चौ. किमी (१३६ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ७२ फूट (२२ मी) | ||
लोकसंख्या (२०१२) | |||
- शहर | ४,५२,०५८ | ||
- घनता | ७,३८८ /चौ. किमी (१९,१३० /चौ. मैल) | ||
- महानगर | ६,२८,७२५ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० |
ब्रिटिश वसाहतीने जेसल्टन ह्या नावाने वसवलेले कोटा किनाबालू लवकरच उत्तर बोर्नियोमधील एक मोठे व्यापारी केंद्र बनले. दुसऱ्या महायुद्धामध्ये कोटा किनाबालूची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. युद्धानंतर ब्रिटिश सरकारने येथे झपाट्याने पुनर्बांधणी केली व उत्तर बोर्नियो वसाहतीचे मुख्यालय येथे हलवले. मलेशियाच्या स्वातंत्र्यानंतर कोटा किनाबालू साबा राज्याच्या राजधानीचे शहर बनले.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत