कॉन्टिनेन्टल एरलाइन्स
(कॉंटिनेंटल एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
कॉन्टिनेन्टल एरलाइन्स अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी होती. ऑक्टोबर २०१० मध्ये ही कंपनी युनायटेड एरलाइन्समध्ये विलीन झाली.[२]. या विलीनीकरणाआधी कॉन्टिनेन्टल एरलाइन्स अमेरिकेतील प्रवासी-मैलानुसार चौथ्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती. तेव्हा व आताही कॉन्टिनेन्टल अमेरिकेच्या ५० राज्यात, लॅटिन अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आशिया-पॅसिफिक भागात विमानसेवा पुरवत असत. ही विमानसेवा मुख्यत्वे नुआर्क, क्लीव्हलॅंड, ह्युस्टन तसेच गुआमच्या ॲंतोनियो बी. वोन पॅट आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कार्यरत होती. यातील बव्हंश सेवा आता युनायटेड एरलाइन्स पुरवते.
| ||||
स्थापना | १९३१[१] | |||
---|---|---|---|---|
हब | क्लीव्हलॅंड, ह्युस्टन, नुआर्क, गुआम | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | वनपास | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
उपकंपन्या | कॉन्टिनेन्टल मायक्रोनेशिया, चेल्सी फूड सर्व्हिसेस | |||
विमान संख्या | ३४६ (उपकंपन्या सोडून) | |||
ब्रीदवाक्य | वर्क हार्ड. फ्लाय राइट. | |||
पालक कंपनी | युनायटेड एअरलाइन्स | |||
मुख्यालय | शिकागो, इलिनॉय | |||
प्रमुख व्यक्ती | जेफ्री स्मायसेक | |||
संकेतस्थळ | www.continental.com |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Norwood, Tom. North American Airlines Handbook. Sandpoint, ID. 2016-11-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-10-04 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2015-02-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-10-04 रोजी पाहिले.