के. कामराज

भारतीय राजकारणी

कुमारसामी कामराज (तमिळ: காமராசர்; १५ जुलै १९०३ - २ ऑक्टोबर १९७५) हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यसेनानी राहिलेले कामराज भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते. १९५४ ते १९६३ दरम्यान तमिळनाडूचे मुख्यमत्रीपद व जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा सांभाळणार्‍या कामराजांनी १९६७ साली इंदिरा गांधींनी कॉंग्रेस (आय) हा नवा पक्ष स्थापन केल्यानंतर उर्वरित कॉंग्रेस पक्षाचे नेतेपद सांभाळले. त्यांच्या मृत्यूनंतर १९७६ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार दिला.

के. कामराज
के. कामराज


कार्यकाळ
१९५४ – १९६३
मागील सी. राजगोपालाचारी
पुढील एम. भक्तवत्सलम

संसद
नागरकोविल साठी
कार्यकाळ
१९६७ – १९७५
मागील ए. नेसामोनी
पुढील कुमारी अनंतन

कार्यकाळ
१९६३ – १९६७
मागील नीलम संजीव रेड्डी
पुढील एस. निजलिंगप्पा

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (ओ) चे पक्षाध्यक्ष
कार्यकाळ
१९६७ – १९७१
मागील कोणीही नाही
पुढील मोरारजी देसाई

जन्म १५ जुलै, १९०३ (1903-07-15)
विरुधु नगर, मद्रास प्रांत
मृत्यू २ ऑक्टोबर, १९७५ (वय ७२)
चेन्नई
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
सही के. कामराजयांची सही
के. कामराज यांचा मरिना बीचवरील पुतळा

तमिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रियता कमावलेल्या कामराज ह्यांच्या आदराप्रित्यर्थ चेन्नईच्‍या अंतर्देशीय टर्मिनलला त्यांचे नाव देण्यात आले आहे.