कॅथलिक धर्म
(कॅथलिक या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅथलिक धर्म हा ख्रिश्चन धर्मातील सर्वात मोठा पंथ वा संप्रदाय आहे. याला कॅथोलिक किंवा रोमन कॅथोलिक असेही म्हणतात. या पंथाचे सर्वोच्च पीठ इटलीमधील रोम शहरामधील व्हॅटिकन सिटी या देशात आहे. पोप हे या पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू असतात.
कॅथलिक पंथ हा मुख्यत्वे इटली, स्पेन, पोर्तुगाल, ब्राझिल व लॅटिन अमेरिकेतील बहुतांश देशात आहे. ब्राझिल हा सर्वाधिक कॅथोलिक पंथाचे अनुयायी असलेला देश आहे. भारतातील ख्रिश्चन हे मुख्यत्वे कॅथोलिक आहे.