कुरुक्षेत्र

भारतातील हरियाणामधील शहर आणि ठिकाण जिथे कृष्णाने अर्जुनला भगवद्गीता सांगितली


कुरुक्षेत्र हे भारत देशाच्या हरियाणा राज्यातील एक ऐतिहासिक शहर व कुरुक्षेत्र जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आहे. ह्याला धर्मक्षेत्र असेही संबोधले जाते. कुरुक्षेत्रचे नाव पौराणिक काळामधील कुरू राजावरून पडले आहे. महाभारतामधील कौरवपांडवांदरम्यान झालेले कुरुक्षेत्र युद्ध येथेच लढले गेले असे मानले जाते. ह्या युद्धादरम्यान आप्तेष्ठांसोबत लढण्यास अनुत्सुक असलेल्या अर्जुनाला उपदेश देण्यासाठी भगवान कृष्णांनी भगवद्गीता सांगितली होती. हिंदू पुराणानुसार कुरुक्षेत्र हे एक शहर नसून भौगोलिक प्रदेश आहे असे मानले गेले आहे.

कुरुक्षेत्र
भारतामधील शहर

कुरुक्षेत्र युद्धादरम्यान रथामध्ये स्वार झालेले भगवान कृष्णअर्जुन
कुरुक्षेत्र is located in हरियाणा
कुरुक्षेत्र
कुरुक्षेत्र
कुरुक्षेत्रचे हरियाणामधील स्थान

गुणक: 29°58′N 76°51′E / 29.967°N 76.850°E / 29.967; 76.850

देश भारत ध्वज भारत
राज्य हरियाणा
जिल्हा कुरुक्षेत्र
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

१९४७ सालापूर्वी थानेसर हे ह्या भागातील प्रमुख शहर होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी कुरुक्षेत्र शहर वसवले गेले. राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कुरुक्षेत्र येथेच स्थित आहे. राष्ट्रीय महामार्ग १ कुरुक्षेत्रमधूनच जातो.