भाषा ही विचारांच्या आदान-प्रदानाचे काम करते, महाराष्ट्रात आज अनेक बोलीभाषा बोलल्या जातात त्याद्वारे प्रत्येक व्यक्ती व्यक्त होत असते.

   कुणबी बोलीभाषा [kunbi Language] या भाषेला बोलीभाषांच्या यादीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. कुणबी समाज किंवा कुणबियांची संस्कृती उलघडणारी ही बोलीभाषा आहे. इतिहास पाहता कुणबी लोकं विविध प्रदेशात विंखुरलेले असल्याने त्याप्रदेशाच्या आसपास असणाऱ्या परदेशात राहणाऱ्या लोकांच्या बोलीभाषेचा कुंणबियांवर व त्यांच्या भाषेच्या उच्चारावर प्रभाव पडला कारणास्तव कुणबी भाषा विविध ठिकाणी विविध लकबीसह, पद्धतीने बोलली जाते म्हणून त्यामध्ये इतर बोलीभाषेप्रमाणे एकसमानता नाही.
 इतिहास पाहता कुणबी लोकांच्या कुणबी बोलीभाषेमध्ये अनेक शब्द, म्हणी, गाणी, संदर्भ येतात व त्यावर विचार केला असता ते फक्त त्याचं भाषेमध्ये आपणाला पहावयास मिळतात, त्यामुळे या विस्तृत भाषेचे त्यामधील अनेक बाबींचे एकत्रीकरण होणे गरजेचे आहे. हे सर्व कुंणबियांची संस्कृती दर्शविणारं साहित्य एकसंघ होऊन वाचकांच्या व अभ्यासकांच्या पुढे येणे गरजेचे आहे आणि आज याविषयी प्रयत्न करतानाही दिसत आहेत.

- चेतन ठाकूर