कुचिंग
कुचिंग (मलाय: Kuching; जावी लिपी: کوچيڠ) ही मलेशिया देशाच्या सारावाक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. कुचिंग शहर बोर्नियो बेटाच्या उत्तर भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.
कुचिंग Kuching |
||
मलेशियामधील शहर | ||
| ||
देश | मलेशिया | |
बेट | बोर्नियो | |
राज्य | सारावाक | |
स्थापना वर्ष | १८२७ | |
क्षेत्रफळ | ४३१ चौ. किमी (१६६ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ८९ फूट (२७ मी) | |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० |
कुचिंग शहर ब्रुनेई साम्राज्याने इ.स. १८२७ मध्ये स्थापन केले. १८ ऑगस्ट १८४२ रोजी जेम्स ब्रूक हा ब्रिटिश उद्योगपती सारावाकचा पहिला गोरा राजा बनला व कुचिंग शहर त्याच्या आधिपत्याखाली आले. दुसऱ्या महायुद्धानंतर सारावाक ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आले व मलेशियाच्या स्वातंत्र्यानंतर कुचिंग सारावाकचे राजधानीचे शहर बनले.
बाह्य दुवे
संपादन- उत्तर कुचिंग अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-09-04 at the Wayback Machine.
- दक्षिण कुचिंग अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील कुचिंग पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत