कीर्ति कुल्हारी

दाक्षिणात्य अभिनेत्री

कीर्ति कुल्हारी (जन्म:३० मे, १९८५) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने २०१० मध्ये खिचडी: द मूव्ही आणि त्यानंतर जून, २०११ मध्ये शैतान या बॉलीवूड चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली.[३] त्यानंतर तिने जल (२०१३), पिंक (२०१६), इंदू सरकार (२०१७), ब्लॅकमेल (२०१८), उरी: द सर्जिकल स्ट्राइक (२०१९), मिशन मंगल (२०१९) आणि शादीस्थान (२०२१) यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटात काम केले आणि समीक्षकांकडून प्रशंसा देखील प्राप्त केली. २०१८-१९ पासून कीर्ति कुल्हारी ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आघाडीच्या नावांपैकी एक म्हणून समोर आली आहे.

कीर्ति कुल्हारी
कीर्ति कुल्हारी (२०१४)
जन्म

कीर्ति कुल्हारी
३० मे, १९८५ (1985-05-30) (वय: ३८)

[१][२]
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००९ - आजतागायत
भाषा हिंदी
पती
साहिल सेहगल
(ल. २०१६; घ. २०२१)

वैयक्तिक आयुष्य संपादन

कुल्हारी चा जन्म महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे झाला असून तिचे कुटुंब मूळचे राजस्थानमधील झुनझुनू जिल्ह्यातील आहे.[४] तिचे वडील भारतीय नौदलात कमांडर होते.[५] कुल्हारीने २०१६ मध्ये अभिनेता साहिल सेहगलशी लग्न केले.[६] परंतु १ एप्रिल २०२१ रोजी हे जोडपे विभक्त झाले.[७]

अभिनय सूची संपादन

चित्रपट संपादन

वर्ष शीर्षक भूमिका नोट्स
2010 खिचडी: द मुव्ही परमिंदर
2011 शैतान तान्या शर्मा
2013 सूपर से ओपर गुलाबो (गुल)
राईझ ऑफ द झोम्बी विनी
2014 जल केसर
2016 क्यूट कमीना अवंतिका
पिंक फलक अली
2017 इंदू सरकार इंदू सरकार
2018 ब्लॅकमेल रीना कौशल
2019 मिशन मंगल नेहा सिद्दीकी
उरी:द सर्जिकल स्ट्राइक फ्लाइट लेफ्टनंट सीरत कौर
2021 द गर्ल ऑन द ट्रेन दलबीर कौर बग्गा नेटफ्लिक्स चित्रपट
शादिस्तान साशा हॉटस्टार चित्रपट

वेब सिरीज संपादन

वर्ष शीर्षक भूमिका नोट्स
2019-सध्याचे फोर मोर शॉट्स प्लिज! अंजना मेनन ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ मालिका
2019 बार्ड ऑफ ब्लड जन्नत नेटफ्लिक्स मालिका
2020 क्रिमिनल जस्टीस: बिहाइंड द डोर अनुराधा चंद्रा हॉटस्टार मालिका
2022 ह्युमन डॉ सायरा सभरवाल हॉटस्टार मालिका

पुरस्कार आणि नामांकन संपादन

चित्रपट पुरस्कार श्रेणी निकाल Ref.
शैतान स्क्रीन अवॉर्ड्स २०१२ बेस्ट एन्सेम्बल कास्ट नामांकन
पिंक ६२वे फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन [८]
जागरण चित्रपट महोत्सव विशेष ज्युरी पुरस्कार विजयी
स्क्रीन अवॉर्ड्स २०१७ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) नामांकन
इंदू सरकार स्क्रीन अवॉर्ड्स २०१८ नामांकन
माया ६४ वा फिल्मफेर पुरस्कार लघुपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विजयी [९]
फोर मोर शॉट्स प्लिज! इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - वेब सिरीज नामांकन
फोर मोर शॉट्स प्लिज! सीझन २ २०२० फिल्मफेर ओटीटी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता मालिका: नाटक (स्त्री) नामांकन [१०]

संदर्भ संपादन

  1. ^ "Kirti Kulhari's on a self love trip this birthday". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 29 May 2020. 19 March 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Kirti Kulhari to don khaki in her next". The New Indian Express. 3 January 2022. 19 March 2022 रोजी पाहिले. The 36-year-old actor wrote
  3. ^ Awaasthi, Kavita (2 August 2012). "Eyes are the most important". Hindustan Times. Archived from the original on 5 August 2012.
  4. ^ "Coming Soon: Aapno Zombie". DNA. 12 July 2012. Archived from the original on 29 October 2013. 11 December 2012 रोजी पाहिले.
  5. ^ Bora, Sugandha (April 1, 2021). "Kirti Kulhari: 10 Things To Know About The Versatile Actor". SheThePeople. 9 May 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Kirti Kulhari Says Marriage To Saahil Sehgal Has Affected Her Career in 'the Best Possible Way'". News18 (इंग्रजी भाषेत). 26 August 2020. 31 December 2020 रोजी पाहिले.
  7. ^ Raghuvanshi, Aakanksha (1 April 2021). "Actress Kirti Kulhari Announces Separation From Husband Saahil Sehgal: "Not On Paper But In Life"". NDTV. 1 April 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "62nd Jio Filmfare Awards 2017 Nominations". Filmfare. 10 January 2017.
  9. ^ "Filmfare Awards 2019: List Of Winners". NDTV. 23 March 2019.
  10. ^ "Nominees for the Flyx Filmfare OTT Awards". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 17 December 2020 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन