कार्ल फ्रीदरिश गाउस

(कार्ल फ़्रिडरीश गाऊस या पानावरून पुनर्निर्देशित)

योहान्न कार्ल फ्रीडरीश गाउस हा एक जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. गाउसने गणिताच्या आणि भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात भर घातली. Number theory, संख्याशास्त्र (Statistics), गणितीय विश्लेषण (Mathematical Analysis), Differential Geometry, Geodesy, Electrostatics, खगोलशास्त्र, Optics अशा अनेक शाखांचा ह्यात समावेश आहे. गाउसला बऱ्याच वेळा "गणिताचा राजकुमार" असे संबोधले जाते तसेच "आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ गणितज्ञ" असे मानले जाते. शास्त्र आणि गणिताच्या विविध शाखांवर गाउसचा अतिशय मोठा प्रभाव आहे आणि त्याला इतिहासातील सर्वांत प्रभावशाली गणितज्ञांपैकी एक मानले जाते.

कार्ल फ्रीदरिश गाउस

ख्रिस्टियान आल्ब्रेख्त येन्सन याने रंगविलेले गाउसचे व्यक्तिचित्र
पूर्ण नावयोहान्न कार्ल फ्रिडरीश गाउस
जन्म एप्रिल ३०, १७७७
ब्राउनश्वाइग, जर्मनी
मृत्यू फेब्रुवारी २३, १८५५
ग्यॉटिंगन, हानोफर, जर्मनी
निवासस्थान जर्मनी
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यक्षेत्र गणित, भौतिकशास्त्र
कार्यसंस्था गेओर्ग-आउगुस्त विद्यापीठ, ग्यॉटिंगन
प्रशिक्षण हेल्मस्टेट विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शक योहान फ्रिदरिश फाफ
डॉक्टरेटकरता विद्यार्थी फ्रिदरिश बेसेल
ख्रिस्टोफ गुडेरमान
ख्रिस्टियान लुडविग गेर्लिंग
रिशार्ड डेडेकिंड
योहान एंक
योहान लिस्टिंग
गेओर्ग फ्रिडरिश बेर्नहार्ड रीमान
ख्याती नंबर थिअरी
गॉशियन
मॅग्नेटिझम
पुरस्कार Copley Medal (१८३८)

गणितातील योगदान

संपादन

गाउसने अंकगणितामधे समरुपतेची (Congruance) संकल्पना मांडली. त्यासाठी गाउसने तीन लहान समांतर् रेषा (≡) हे चिह्न वापरले. या चिह्नाच्या वापरामुळे अंकाच्या समरूपतेचा अर्थबोध फार चटकन होतो. यामुळे गणितामधे केवळ संकल्पनाच नाही तर् चिह्नेही अतिशय महत्त्वाची आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. गाउसने Disquisitiones Arithmeticae अंकगणितामधील संशोधन हा ग्रंथ लिहीला. या ग्रंथामधे अंकगणितातील जुने सिद्धांत अतिशय काटेकोरनी सुसंबद्ध पद्धतीने लिहून काढले. अंकगणितामधे काही क्रांतिकरी संशोधन गाउसने या ग्रंथामधे मांडले. गाउसने वयाच्या १८व्या वर्षी बीजगणिताचे मुलभूत प्रमेय सिद्ध केले. त्याने पुढे जाऊन त्याने आपल्या सिद्धांतामधील चुकही शोधली आणि ती दुरुस्त करत, मृत्युपुर्वी त्याने बीजगणिताचे मुलभूत प्रमेयाच्या अनेक सिद्धता दिल्या. गाउसने पहिल्यांदा कॉम्प्लेक्स नंबर पद्धतीच्या अस्तित्वाची सिद्धता दिली. त्याने "नकाशे बनवणाऱ्यांचा प्रश्न" = Map makers problem सोडवला. तो सोडवताना त्याने अतिशय सुंदर भौमितिक संकल्पनांना जन्म दिला. अयुक्लिडीयन भुमितीचा शोध लागल्यावर आपणासही ही कल्पना ठाऊक होती मात्र लोक भयास्तव आपण हे काम् कधी बाहेर आणले नाही असा गौप्यस्फोट गाउसने केला होता. यामुळे जरी वाद निर्माण झाला असला तरी आता हे सिद्ध झाले आहे की गाउस खरे बोलत होता. गाउसने भौतिकशास्त्र व अभियांत्रिकीतही काम केले. भौतिकशास्त्रातील स्थिरविद्युत (Electrostatics) गाउसचा सिद्धांत अतिशय मुलभुत म्हणून प्रसिद्ध आहे. संख्याशास्त्रामधे त्याने "गाउसचा वक्राकार" (Gaussian curve) ही संकल्पना मांडली. त्याने प्रकाशाचानी भिंगांचाही अभ्यास केला.