कामारेड्डी (Kamareddy) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या यदाद्रि भुवनगिरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. इ.स. १६०० ते १६४० या काळात या भागावर राज्य करणाऱ्या डोमकोंडा किल्ल्याचा शासक चिन्ना कामारेड्डी यांच्यावरून जिल्ह्याचे नाव कामारेड्डी पडले. हे राज्याची राजधानी हैदराबादच्या उत्तरेस सुमारे ११७ किलोमीटर (७३ मैल), निजामाबादपासून ५६ किलोमीटर (३५ मैल) आणि करीमनगरपासून ९६ किलोमीटर (६० मैल) अंतरावर आहे.

  ?कामारेड्डी
कामारेड्डी
तेलुगू : భువనగిరి
तेलंगणा • भारत
—  शहर  —
Map

१८° १९′ ००.१२″ N, ७८° २१′ ००″ E

कामारेड्डी is located in तेलंगणा
कामारेड्डी
कामारेड्डी
कामारेड्डीचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 18°19′22.8″N 78°20′6″E / 18.323000°N 78.33500°E / 18.323000; 78.33500

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१४.१० चौ. किमी
• ४६८ मी
हवामान
वर्षाव

• ९५१.६ मिमी (३७.४६ इंच)
प्रांत तेलंगणा
जिल्हा कामारेड्डी जिल्हा
लोकसंख्या
घनता
८०,३१५
• ५,६९६/किमी
भाषा तेलुगू
संसदीय मतदारसंघ झहीराबाद
विधानसभा मतदारसंघ कामारेड्डी
स्थानिक प्रशासकीय संस्था कामारेड्डी नगरपालिका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• 503111,503112
• +०८४६८
• IN-KMC
• TS-17[]
संकेतस्थळ: कामारेड्डी नगरपालिका

लोकसंख्या

संपादन

२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १७,७५९ कुटुंबांसह ८०,३१५ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ३९,६६० पुरुष आणि ४०,६५५ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे १०२५ स्त्रिया. ०-६ वयोगटातील मुलांची लोकसंख्या ८७७२ आहे जी कामारेड्डीच्या एकूण लोकसंख्येच्या १०.९२% आहे.सरासरी साक्षरता दर ७९.४४% होता.

७०.५४% लोक हिंदू आणि (२७.७५%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (०.८५%), शीख (०.२९%), बौद्ध (०.०२%), जैन (०.३२%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.२४%) यांचा समावेश होतो.[][][]

तेलुगू नागरकर्नूलमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.

भुगोल

संपादन

कामारेड्डी हे उत्तर अक्षांशाच्या १८°१९′१२″N आणि पूर्व रेखांशाच्या ७८°२१′००″E वर स्थित आहे. कामारेड्डीची सरासरी उंची ४६८ मीटर आहे.[] वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९५१.६ मिलिमीटर (३७.४६ इंच) आहे.[]

पर्यटन

संपादन

कामारेड्डी शहराच्या जवळपास असलेली पर्यटन स्थळे.

  • निजामसागर धरण, निजामसागर (कामारेड्डी पासून ५७.३ कि.मी. अंतरावर)
  • डोमकोंडा किल्ला (कामारेड्डी पासून १९.३ कि.मी. अंतरावर)
  • कौलास किल्ला, कौलास, जुक्कल मंडळ (कामारेड्डी पासून ११२.३ कि.मी. अंतरावर)
  • पोचारम प्रकल्प, पोचाराम (गाव), नागरेड्डीपेट मंडळ
  • कौलास नाला प्रकल्प, सावरगाण (गाव), जुक्कल मंडळ

प्रशासन

संपादन

कामारेड्डी नगरपालिकेची स्थापना ही १९८७ मध्ये करण्यात आली, शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. सध्या नगरपालिकेचे कार्यक्षेत्र १४.१० किमी (५.४४ चौरस मैल) मध्ये पसरलेले असून ३३ प्रभाग आहेत. अदलूर, टेकरियाल, लिंगपूर, देवुनिपल्ली, सरमपल्ली आणि चिन्नमल्लारेड्डी ही आजूबाजूची गावे कामारेड्डी नगरपालिकेत विलीन करण्यात आली आहेत. कामारेड्डी हे शहर कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात येते. जो झहीराबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो. [][]

वाहतूक

संपादन

कामारेड्डी येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे दोन बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते. कामारेड्डी हे शहर राष्ट्रीय महामार्ग ४४ या महामार्गावर आहे. कामारेड्डी रेल्वे स्थानक शहराला रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करते.

हे देखाल पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
  2. ^ "Kamareddy Municipality City Population Census 2011-2022 | Andhra Pradesh". www.census2011.co.in. 2022-02-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2016-06-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-02-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Basic Information of Municipality, Kamareddy Municipality". kamareddymunicipality.telangana.gov.in. 2022-02-09 रोजी पाहिले.
  5. ^ "Kamareddy topographic map, elevation, relief". topographic-map.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.
  6. ^ ":: Rainfall Integration::". www.tsdps.telangana.gov.in. 2022-02-09 रोजी पाहिले.
  7. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2016-06-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-02-09 रोजी पाहिले.
  8. ^ "कामारेड्डी नगरपालिका".