त्रिकोण

(काटकोन त्रिकोण या पानावरून पुनर्निर्देशित)

एका सरळ रेषेत नसलेले तीन बिंदु सरळ रेषांनी जोडून तयार झालेल्या आकृतीस त्रिकोण म्हणतात. या रेषांना त्रिकोणाच्या बाजू म्हणतात. त्रिकोणाच्या आकृतीतील सर्वात खालच्या बाजूला त्रिकोणाचा पाया म्हणतात. सर्वात वरच्या कोनबिंदूला शिरोबिंदू. शिरोबिंदूपासून पायावर टाकलेल्या लंबरेषेच्या, शिरोबिंदू ते पाया या लांबीला त्रिकोणाची उंची म्हणतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० अंश असते. त्यामुळे कोणतेही दोन कोन माहीत असल्यास तिसरा कोन सहज काढता येतो. त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूसमोरील कोन सर्वात मोठा असतो. त्रिकोणाचा पाया व उंची माहीत असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते.

त्रिकोण

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२*पाया*उंची

बाजूंच्या तुलनात्मक लांबीपासूनचे प्रकार

संपादन

कोनांपासूनचे प्रकार

संपादन

लघुकोन त्रिकोण

संपादन

या त्रिकोणात प्रत्येक कोन ९० अंशाहून कमी मापाचा असतो.

विशालकोन त्रिकोण

संपादन

या प्रकारच्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन (९० अंशापेक्षा मोठा) असतो.

काटकोन त्रिकोण

संपादन
 
काटकोन त्रिकोण

या प्रकारच्या त्रिकोणात एक काटकोन असतो. काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. कर्णाची लांबी उरलेल्या दोन बाजूंमधील प्रत्येक बाजूपेक्षा जास्त असते. इतर दोन बाजू पाया आणि उंची दर्शवतात, त्यामुळे त्यांची लांबी माहीत असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. प्रसिद्ध "पायथागोरसचा सिद्धांत" याच त्रिकोणास लागू होतो. त्या सिद्धांतानुसार या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असल्यास तिसरी बाजू आणि सर्व कोनांची माहिती मिळू शकते. काटकोनाव्यतिरिक्त आणखी एक कोन आणि तीन बाजूपैकी एक बाजू माहीत असली तरी, तिसरा कोन आणि इतर दोन बाजूंची माहिती काढता येते.