कांड्या करकोचा

मंगोलिया व यूरेशिया मध्ये सापडणारा पक्षी

कांड्या करकोचा हा क्रौंच प्रकारचा पक्षी आहे. असे असूनही मराठीत यास कांड्या करकोचा असेच म्हणतात. महाराष्ट्रात हा स्थलांतरित असून मुख्यत्वे हिवाळ्यात अथवा उन्हाळ्यात स्थलांतर करतो. हा राजस्थानात मोठया प्रमाणावर आढळून येतो. महाराष्ट्रातील कांड्या करकोचे हे पाकिस्तानातुन किंवा इराण मधून अन्नाच्या उपलब्धतेसाठी स्थलांतर करतात. शेतीतील धान्याचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडतात त्यामुळे शेतकरी वर्गात हे पक्षी आल्यावर नाराजीचे वातावरण असते. हे पक्षी मोठ्या संख्येने थवे करून राहातात व इतर क्रौंचापेक्षा आकार लहान असला तरी कर्कश आवाज करण्यामध्ये मात्र पुढे आहेत.

कांड्या करकोचा (क्रौंच), राजस्थानमधील चित्र

साधारणपणे मीटरभर उंचीचे हे क्रौंच हलक्या करड्या रंगाचे असतात, यांना ओळखण्याची मुख्य खुण म्हणजे डोक्यावर करडा पट्टा असतो व सुरेख पांढरी भुवई असते. गळ्यावर काळ्या रंगाचा पट्टा असून तो मफलरप्रमाणे दिसतो.

चित्रदालन संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: