पाणथळी पक्ष्यामध्ये कदाचित सर्वात रुबाबदार पक्षी कुठले तर क्रौंच पक्ष्यांकडे बोट दाखवावे लागेल. क्रौंच पक्ष्यांच्या अनेक जाती आहेत अत्यंत लांबवर उड्डाणांसाठी प्रसिद्ध असलेले हे क्रौंच पक्षी इतर पाणथळी पक्ष्यांपेक्षा बरेच दुर्मिळ आहे. दुर्मिळ असण्याचे मुख्य कारण त्यांची होणारी शिकार तसेच प्रजननाचे कमी प्रमाण व इतर मानवी हस्तक्षेप इत्यादी आहेत. इतर पाणथळी पक्ष्याचे म्हणजे सारंग किंवा सारस, क्रौंच हे भाउबंद आहेत. लांब वरून हे सारखेच दिसतात परंतु क्रौंच पक्षी जेव्हा उडतात तेव्हा त्यांची मान लांब करून उडतात तर इतर बगळे व करकोचे हे मान इंग्रजी एस आकारात दुमडुन उडतात. तसेच इतरांपेक्षा क्रौंच पक्षी हे भारतात उन्हाळा सुरू झाला की ते कुठे परत जातात.लांबवर उड्डाणे भरतात. काही आंतरखंडीय स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी कधी मोठे मोठे कळप करून राहातात तर कधी कधी एकटे अथवा फक्त जोडिदाराबरोबर असतात.

तुरेवाला क्रौंच

मुख्य जातीसंपादन करा

संस्कृतीमध्येसंपादन करा

क्रौंच भारतीय संस्कृती मध्ये प्रेमाचे प्रतिक मानले जाते. त्याचे कारण म्हणजे क्रौंचामध्ये बहुतकरून नर- मादि जोडी असते जी आयुष्यभर बरोबर राहाते, क्रौंचाच्या प्रणयक्रिडा व नृत्य ज्यांनी पाहिले असेल त्यांना वरचे प्रतिक मनोमन पटेल. या क्रौंच पक्षावरूनच महर्षी वाल्मिकिंना काव्य स्फुरले असे मानतात.'मा निषाद सुखं तव आप्ससि, हत्वा मिथुनादेकं क्रौंच युगलं । ( अरे व्याधा ! क्रौंच पक्षाच्या मैथुन करणाऱ्या जोडप्यापैकी एकाची हत्या करून तुला सुख मिळणार नाही.)

भारतातील क्रौंचसंपादन करा

भारतात सारस क्रौंच, सायबेरियन क्रौंच, कांड्या करकोचा (क्रौंच) व साधा क्रौंच हे मुख्यत्वे आढळून येतात. सायबेरियन क्रौंच हा हिवाळ्यात सायबेरिया येथुन राजस्थानमधील भरतपुर येथे स्थलांतर करतो. हा पक्षी आता अत्यंत दुर्मिळ झाला असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.